आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतर लादेनचा मृतदेह ओळखूही येत नव्हता, असे उलगडले रहस्य!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- दहशतीचे दुसरे नाव म्हणजे ओसामा बिन लादेन. अमेरिकेच्या लष्‍करी कारवाईत म्हणजे 2 मे 2011 रोजी तो मारला गेल्याचे वृत्त आले होते. मात्र या वृत्तावर बहुतेकांचा विश्‍वास बसत नव्हता. ही मोहिम यशस्वी करणारे अमेरिकन नेव्ही सील अधिका-यांचीही अशीच स्थिती बनली होती. कमी वयाचा ओसामा का दिसत होता...
 
'हा हाच आहे तो ज्याचा आम्ही शोध घेत होतो, जेव्हा टॉम मला असा म्हटला होता तेव्हा विश्‍वासच बसला नाही. कदाचित टॉमलाही पूर्ण खातरजमा करायचे होते, की मारला गेलेला क्रूर दहशतवादी ओसामा बिन लादेनच होता का? लादेनचे छायाचित्र आणि मारण्‍यात आलेला लादेनमध्‍ये काही फरक होता. मृत लादेन खूपच तरुण दिसत होता. मात्र येथे असलेल्या एका वस्तूंने यावरील पडदा हटवला. वास्तविक लादेन काळे केस करण्‍यासाठी कलर वापरत असे. या कारणामुळे त्याचे वय 10 वर्षांनी कमी दिसत होता.
 
पुस्तकात केले अनेक गौप्यस्फोट-
 
याबाबतचा गौप्यस्फोट नेव्ही सील टीमच्या माजी सदस्याने केला. त्याने 'नो इजी डे - द ऑटोबायोग्राफी ऑफ ए नेव्ही सील' याबाबतचा उल्लेख केला आहे. 'ऑपरेशन नेपच्युन स्पीअर'मध्‍ये सहभाग असलेले नेव्ही कमांडोने पुस्तकात लादेनशी संबंधित सनसनाटी खुलासे केले आहे. त्याला मारण्‍यासाठी ऑपरेशन कुठपर्यंत प्लॅन केले होते, याबाबतचा उल्लेख पुस्तकात केला गेला आहे.
 
(2 मे 2011 रोजी ओसामाला पाकिस्तानमधील एबोटाबादमध्‍ये अमेरिकेच्या नेव्ही सीलने मारले होते. त्याच्या मृत्यूला आज सहा वर्ष झाली आहेत.)
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्‍या, त्या रात्री नेमके काय झाले आणि लादेनच्या मृत्यूची कहाणी...
बातम्या आणखी आहेत...