आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओसामा बिन लादेनच्या मुलाने दिली धमकी, अमेरिकेचा बदला घेऊच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरूत - ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा याने अमेरिकेला वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. त्याने सोशल मीडियावर २१ मिनिटांची ऑडिओ टेप जारी केली असून तिचे शीर्षक ‘आम्ही सर्व ओसामा’ असे आहे.
पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये २ मे २०११ रोजी अमेरिकेने ओसामाच्या घरात घुसून त्याला ठार मारले होते.हमजा याने या टेपमध्ये म्हटले आहे की, ‘अबोटाबाद येथे केलेल्या गुन्ह्याची सजा मिळणार नाही, असे तुम्ही समजत असाल तर ते चुकीचे आहे. एबटाबादमध्ये जे झाले त्यासाठी अमेरिकेचे नेतृत्व जबाबदार आहे. अल कायदा मुस्लिमांचे दमन करण्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांच्या विरोधात लढा सुरूच ठेवेल. आम्ही अफगाणिस्तान, सिरिया, इराक, येमेन, सोमालिया आणि इतर मुस्लिम देशांवर अमेरिकेद्वारे सुरू असलेल्या हल्ल्यांचा बदला घेऊ.’माध्यमांच्या वृत्तानुसार, हमजाचा हा व्हिडिओ म्हणजे अल-कायदाला पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न आहे. ओसामाच्या मृत्यूनंतर संघटनेची दहशतवाद्यांवरील पकड कमजोर होत चालली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीने हमजाचा परिचय दिला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, ओसामाच्‍या मुलाचा फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...