आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायप्रोफाइल कोर्ट केस, समोर आल्या गर्लफ्रेंड्च्या हत्येच्या दोन वेगवेगळ्या Stories

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिटोरिया - गर्लफ्रेंडचा मर्डर करणारा दक्षिण आफ्रिकेचा ऑलिम्पक-पॅरालिम्पिक अॅथलिट ऑस्कर पिस्टोरियसची मंगळवारी तुरुंगातून सुटका झाली. आता उर्वरित पाच वर्षांची शिक्षा तो प्रिटोरियामध्ये त्याच्या अंकलच्या घरात भोगणार आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कोर्टाने त्याला मैत्रणीच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा आरोपी ठरवले होते. त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्रकरण एवढे हायप्रोफाइल होते की, त्याच्या सुनावणीचे जगभरात त्याच्या सुनावणीचे लाइव्ह टेलिकास्ट करण्यात आले होते.

काय होते प्रकरण ?
14 फेब्रुवारी 2013 रोजी पिस्टोरियसने प्रिटोरियामध्ये घराच्या बाथरूममध्ये गर्लफ्रेंड रीवा स्टीनकॅम्पची हत्या केली होती. पिस्टोरियसने दावा केला की, त्याने बाथरूममध्ये कोणीतरी शिरले आहे असे समजून फायरिंग केले होते. पण ती त्याची गर्लफ्रेंड होती.

अनेक बंधने असणार
पॅरोल बोर्डच्या मते पिस्टोरियसने तुरुंगात 12 महीने शिक्षा भोगली आहे. उर्वरित शिक्षा त्याला घरात नजरकैदेत राहावे लागणार आहे. या दरम्यान त्याच्यावर अनेक बंधने येतील. त्याची सायकोथेरेपीही सुरू राहील.

कोण आहे पिस्टोरियस?
> ऑलिम्पिक पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट पिस्टोरियस 'ब्लेड रनर' च्या नावाने प्रसिद्ध आहे. लहानपणापासूनच त्याला दोन्ही पाय नाहीत. तो दोन कार्बन फायबर ब्लेडद्वारे धावतो.
> त्याने लंडन 2012 पॅरालिम्पिक गेम्समध्ये 400 मीटर रनिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते.
> बीजिंग 2008 मध्ये 100, 200, 400 मीटकमध्ये मिळवले गोल्ड मेडल.
> अथेन्स ऑलिम्पिक 2004 मध्ये 200 मीटरमध्ये सुवर्णपदक.

पुढील स्लाइड्सवर पाहा. गर्लफ्रेंड्च्या मर्डरची दुसरी Story...