आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्करच्या प्रतिमेची किंमत केवळ 666 रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
File Photo - Divya Marathi
File Photo
लॉस एंजलिस- ऑस्करच्या ट्रॉफीला मनोरंजनाच्या दुनियेत भलेही सर्वात मोठी ट्रॉफी मानण्यात येत असले तरी ऑस्करच्या या प्रतिमेची किंमत एेकून तुम्ही हैरान होऊन जाल. ऑस्करच्या या बहुचर्चित व प्रतिष्ठित प्रतिमेची किंमत फक्त १० डॉलर म्हणजेच ६६६ रुपये आहे.

एंटरटेनमेंट वीकलीच्या एका अहवालानुसार, ऑस्कर पुरस्काराची ट्रॉफी तयार करण्यासाठी एकूण ४०० अमेरिकी डॉलर खर्च येतो. मात्र  एका नियमानुसार लिलावासाठी त्या पाठवण्यापूर्वी १० अमेरिकी डॉलर किमतीत अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्स अँड सायन्सला ही तयार झालेली ट्रॉफी सादर करणे बंधनकारक आहे.

 या नियमाच्या पाठिराख्यांपैकी एक ऑस्कर विजेते स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी बेट्टे डेव्हीस आणि क्लार्क गाबले यांच्या ऑस्कर प्रतिमा परत मिळवण्यासाठी १३ लाख ६० हजार अमेरिकी डॉलर खर्च केले आणि त्या पुन्हा अकादमीला परत केल्या. हा नियम २०१५ मध्ये न्यायालयाच्या एका निर्णयातही कायम ठेवण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...