आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष: या देशात महिला गाजवतात वर्चस्व, पुरूषांना बनवतात गुलाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या देशातील महिला पुरुषांना जनावराप्रमाणे वागणूक देतात. - Divya Marathi
या देशातील महिला पुरुषांना जनावराप्रमाणे वागणूक देतात.
इंटरनॅशनल डेस्क - आज 8 मार्च, जगभरात महिला दिवस साजरा केला जात आहे. महिलांना समान न्‍याय, हक्‍क, अधिकार व सन्‍मान मिळावा हे जगाचे लक्ष्‍य आहे. त्याचाच भाग म्हणून जागतिक महिला दिन साजरा केला जातो. मध्य पूर्व आणि विकसित देशांमध्‍ये महिलांच्‍या सामाजिक स्‍थितीत अजूनही आवश्‍यक त्‍या प्रमाणात सुधारणा झाल्‍या नाहीत. भारतात आजही महिलांना शोषणाचा सामना करावा लागतो. पण युरोपात एक देश असा आहे की, जेथे महिला पुरूषांचे शोषण करतात. जाणून घ्‍या या देशातील महिलांविषयी....
 
- पुरूषांना राबवणा-या देशाचे नाव आहे 'अदर वर्ल्ड किंगडम'.
- 1996 मध्‍ये युरोपियन देश चेक रिपब्‍लिकपासून त्‍याची निर्मिती झाली.
- या देशातील राज्‍यकारभारही महिला सांभाळतात. येथे सत्‍ताधारी राणी आहे.
- पॅट्रिसिया-1 ही या देशाची राणी आहे. तिचेच या संपूर्ण देशावर राज्‍य आहे.
- मात्र, या प्रदेशाला इतर देशांनी देशाचा दर्जा दिला नाही. ब्‍लॅक सिटी ही राजधानी आहे.
 
पुरुष आहेत महिलांचे गुलाम-
 
- 'अदर वर्ल्ड किंगडम'चा ध्‍वज, चलन, पासपोर्ट व लष्‍करही आहे.
- येथे महिला या नागरिकांप्रमाणे आहेत. तर, पुरूषांना जनावरांप्रमाणे वागणूक दिली जाते.
- पुरुषांना या देशात गुलाम समजले जाते. त्‍यांना महिला राबवून घेतात.
- या देशाची निर्मिती करण्‍यासाठी 12 कोटी रूपये खर्च आला होता.
 
महाराणीसाठी बनवावी लागते खुर्ची-
 
- या देशात दुस-या देशातून येणा-या पुरूषांना राणीसाठी खुर्ची किंवा सोफा तयार करावा लागतो.
- विदेशी पुरूषांनी तयार केलेल्‍या आसनावरच महाराणी बसते.
- येथे गुलाम पुरूषांना मद्य दिले जाते तर ते मा‍लकिनच्‍या पायावर टाकले जाते.
- महाराणी पॅट्रिसिया-1 ला कायद्यांमध्‍ये बदल करण्‍याचा अधिकार आहे.
- महिलांना या देशाचे नागरिकत्‍व हवे असल्‍यास, राणीने तयार केलेले नियम पाळावे लागतात.
 
काय आहेत नियम ?
 
- नागरिकत्व मिळवण्‍यासाठी त्‍या महिलेकडे कमीत कमी एक पुरूष नोकर असावा.
- अदर वर्ल्ड किंगडमच्‍या सर्व नियमांचे पालन करण्‍यास ती महिला तयार असावी.
- महिलांना कमीत कमी पाच दिवस महाराणीच्‍या महालात रहावे लागेल.
 
काय आहेत सुविधा-
 
- केवळ 7.4 एकर जमिनीवर असलेल्‍या या देशात मोठमोठ्या इमारती आहेत.
- या देशात 250 मीटरचे ओव्‍हल ट्रॅक, लहान तलाव आणि मैदान आहे.
- महाराणीचा महाल येथील मुख्‍य इमारत आहे.
- एक मेजवानी हॉल, लायब्ररी, न्‍यायालय, शाळा, व्‍यायामशाळा, तुरूंग अशा इमारतीही आहेत.
- जलतरण तलाव, रेस्टॉरंट व Nightclubs ही येथे आहे.
 
पुढील स्‍लाईड्सवरील फोटोंमध्‍ये पाहा, महिला असे करतात पुरूषांचे शोषण...
बातम्या आणखी आहेत...