आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववा ग्रह: सूर्यमालेत सापडला नवा पाहुणा, ग्रहावर फक्त बर्फच असल्याचा निष्कर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क - आपल्या सूर्यमालेत प्लुटो हा शेवटचा ग्रह. त्यानंतर केवळ अंधारलेली खोल पोकळी. मात्र, संशोधकांनी आता या गडद अंधारलेल्या पोकळीत विशाल ग्रह असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे हा ग्रह हिमाच्छादित असल्याचाही शास्त्रज्ञांचा दावा आहे.
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी या पाहुण्या ग्रहाला ‘प्लॅनेट नाईन’ असे नाव दिले आहे. शास्त्रीयदृष्ट्या विचार करता प्लुटोने पूर्वीच नवव्या ग्रहाचा दर्जा गमावला असल्याने या नवीन ग्रहाला आता नववे स्थान मिळण्याची शक्यता आहे.
खगोलविषयक एका प्रसिद्ध नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पृथ्वीच्या तुलनेत हा ग्रह सुमारे पाच ते दहा पटीने मोठा आहे. अंतराळ संशोधक मायकेल ब्राऊन आणि कॉन्स्टॅंटिन बॅटगीन यांनी या ग्रहाचा शोध लावला. त्यांना याचे पुरावे सापडले आहेत. मात्र त्यांनी अद्याप हा ग्रह प्रत्यक्ष पाहिलेला नाही.
सूर्यमालेतील डॉर्फ ग्रह (फ्लुटो, इरीस, मेकमेक, हाऊमेया आणि सेरेस), सूक्ष्म पदार्थांचा स्थानासह गतीचा अभ्यास करत असताना या दोन्ही शास्त्रज्ञांना हा नवा ग्रह आढळला. गुरु किंवा शनी या ग्रहांच्या गुरुत्वीय बलामुळे हा नववा ग्रह अंधारात ढकलला गेला असावा, अशीही शक्यता यात वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पृथ्वीच्या सूर्याभोवती होणाऱ्या परिभ्रमणावर या नव्या आिण नवव्या ग्रहाच्या गुरुत्वाचा परिणाम होत असल्याचेही शास्त्रज्ञांना अभ्यासात आढळून आल्याचे या नियतकालिकात नमूद करण्यात आले आहे.
(फ्लुटो, इरीस, मेकमेक, हाऊमेया आणि सेरेस यांना डोर्फ ग्रह म्हटले जाते. ग्रह असे संबोधण्यासाठी आवश्यक असलेल्या मानकांमध्ये बसत नसलेल्या एखाद्या ऑब्जेक्टला डोर्फ ग्रह असे म्हटले जाते.)
उत्सुकता वाढली
आपल्या सूर्यमालेत आणखी काही ग्रह असावेत हा खगोलप्रेमींचा फार पूर्वीपासूनचा कयास आहे. प्लुटोच्या शोधानंतर मात्र असा नवा पाहुणा सापडला नव्हता. किंबहुना अंतराळात भ्रमण करत असलेल्या एखाद्या ग्रहासारख्या आकृतीला ग्रह म्हणावे किंवा नाही, याबद्दल संशोधक साशंक होते. यानंतरच्या काळात प्रथमच ब्रह्मांडाच्या लपलेल्या अंधारविश्वात ग्रहाची चाहूल प्रथमच लागली आहे. त्यामुळे या ग्रहाच्या रचनेबद्दल जगभरातील अभ्यासकांत आता उत्सुकता वाढली आहे.