आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ब्स अंडर 30 सुपर अचीवर्स यादीत आलियासह 53 भारतीयांचा समावेश ; दीपा, साक्षी पुढे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क - फोर्ब्सने 2017 साठी आशिया खंडातील 30 वर्षे वयोगटातील सुपर अचीवर्सची यादी जाहीर केली. यात भारताच्या 53 जणांना समाविष्ट करण्यात आले आहे. त्यातही प्रामुख्याने अभिनेत्री आलिया भट्ट, जिमनॅस्ट दीपा कर्माकर आणि ऑलिंपिक ब्रॉन्झ मेडलिस्ट साक्षी मलिक पुढे आहेत. 
 
यादीत चीनच्या 76 जणांचा समावेश
- फोर्ब्सने '30 अंडर 30' आशियाची यादी जाहीर करण्याची ही दुसरी वेळ आहे. यात चीनच्या 76 जणांचा समावेश करण्यात आला आहे. 
- यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या आकडेवारीप्रमाणे, चीन पहिल्या तर, भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. तब्बल 53 भारतीयांना यादीत स्थान देण्यात आले आहे.
- फोर्ब्सने 10 विविध वर्गवारींमध्ये 30-30 व्यक्तींची यादीत तयार केली. अर्थातच त्यामध्ये मनोरंजन, उद्योग, किरकोळ व्यापार, सोशल आंत्रप्रेन्योर आणि तंत्रज्ञान जगतातील 300 लोकांचा समावेश आहे. 
 
भारताकडून या लोकांचा समावेश
दीपा कर्माकर (23) : भारताकडून यादीत दीपा सर्वात पुढे आहे. ती ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारी भारताची पहिली जिमनॅस्ट आहे. भारताकडून ऑलिम्पिक जिमनॅस्टमध्ये एका महिलेने सहभाग नोंदवण्याची 52 वर्षातील ही पहिलीच वेळ होती. फोर्ब्सने सांगितल्याप्रमाणे, "दीपा कर्माकरने मेडल मिळविले नसले तरीही जबरदस्त परफॉर्मन्स देऊन चौथे स्थान मिळविले. केवळ 0.15 पॉइंट्सवरून तिचा ब्रॉन्झ मेडल हुकला. 
साक्षी मलिक (24) : साक्षीने गेल्या वर्षी झालेल्या रियो डी जेनेरियो ऑलिंपिकमध्ये रेसलिंग स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळविले. असे करणारी ती भारताची पहिलीच महिला रेसलर आहे. फोर्ब्सच्या मते, "एका छोट्याश्या शहरातून (रोहतक) येणारी साक्षी हिने अवघ्या 12 वर्षांच्या वयातच कुस्ती लढली होती. त्यावरून तिला खूप विरोधाला सामोरे जावे लागले होते."
श्रीकांत बोला (25) : बोला यांना मैन्युफॅक्चरिंग अॅन्ड एनर्जी कॅटेगरीमध्ये जागा मिळाली. ते बोलांट इडस्ट्रीजचे संस्थापक बोला यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. जन्माने अंध असलेले बोला यांनी मैसाच्युसेट्स इंस्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीचे पहिले विद्यार्थी बनले. यानंतर त्यांनी हैदराबाद येथे कंपनी स्थापित केली. त्यांच्या कंपनीत दिव्यांगांसाठी इको-फ्रेंडली उपकरणे बनवली जातात." असे वर्णन फोर्ब्सने केले. 
आलिया भट्ट (24) : आलिया हिचा समावेश सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत करण्यात आला आहे. 20 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या आलिया हिने सुरुवातीच्या 6 चित्रपटांमध्ये 15 दशलक्ष (मिलियन) डॉलरची कमाई केली. 
बातम्या आणखी आहेत...