आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत 680 हून अधिक स्थलांतरितांना अटक, ट्रम्प म्हणाले गुन्हेगारांना प्रवेश नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेमध्ये वाईट प्रवृत्तीच्या लोकांना येऊ देणे आम्हाला कधीही शक्य होमार नाही. (फाइल) - Divya Marathi
अमेरिकेमध्ये वाईट प्रवृत्तीच्या लोकांना येऊ देणे आम्हाला कधीही शक्य होमार नाही. (फाइल)
वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये इमिग्रेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी 680 हून अधिक प्रवाशांना अटक केली आहे. ट्रम्प यांनी क्रिमिनल्सच्या विरोधात होत असलेल्या कारवाईचा बचाव करत म्हटले की, आमचा उद्देश वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा प्रवेश रोखणे हा आहे. ट्रम्प अॅडमिनिस्ट्रेशनने 7 मुस्लीमबहुल देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत प्रवेश बंदी लादली होती. कोर्टाने मात्र हा निर्णय रद्द केला होता. त्याविरोधात ट्रम्प अॅडमिनिस्ट्रेशनने अपील केले आहे. 

अटक केलेल्यांमध्ये 75% किमिनल्स 
- होमलँड सेक्युरिटी डिपार्टमेंट (डीएचएस)चे सेक्रेटरी जॉन केली यांनी सोमवारी याठिकाणी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की, इमिग्रेशन ऑफिसर्सने नुकत्याच चालवलेल्या रेग्युलर कॅम्पेनअंतर्गत ही कारवाई केली आहे. 
- अरेस्ट करण्यात आलेल्यांपैकी 75% विविध गुन्ह्यांमधील आरोपी होते. 
- अशा स्थलांतरीतांकडे हवी ती कागदपत्रे नसल्याचेही सांगण्यात आले आहे. 
- व्हाइट हाउसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प अमेरिकेच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी इमिग्रेशनशी संबंधित नवीन नियम जाहीर करू शकतात. 
- वादग्रस्त ट्रॅव्हल बॅनचा निर्णय नियमांच्या बाहेर जाऊन लादलेला नसल्याचेही अधिकारी म्हणाले. 

ट्रम्प म्हणाले, ग्रेट जॉब
- ट्रम्प यांनी स्थलांतरीत गुन्हेगारांच्या विरोधातील या कारवाईचे समर्थन केले आहे. 
- आम्ही खरंच, चांगले काम केले आहे. गुन्हेगार असलेल्यांना आम्ही अटक करत आहोत. ते अत्यंत सराईत गुन्हेगार आहेत. काहींचा रेकॉर्ड तर खूपच वाईट आहे. आम्ही त्यांनाच बाहेर काढतोय. मी जे बोलतो, ते करतोच, याचाच हा एक भाग आहे. 
- ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रीड्यू यांच्याबरोबर झालेल्या जॉइंच प्रेस कॉन्फरन्सदरम्यान मीडियाशी याबाबत चर्चा केली. 
- ट्रम्प म्हणाले, अॅडमिनिस्ट्रेशन अमेरिकेच्या सुरक्षेसाठी पॉलिसी अत्यंत कठोरपणे राबवत आहे. इतर देशांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. 
 
वाईट प्रवृत्तींचे स्वागत नाही 
ट्रम्प म्हणाले, आम्ही पूर्णपणे दारे उघडू इच्छितो, लोकांनी आमच्या देशात यावे असेच आम्हाला वाटते, पण आम्ही वाईट प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश देऊ शकत नाही. 
 
पुढे वाचा, अवैध राहणाऱ्या भारतीयांची संख्या...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...