आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS वरुन अमेरिकेत दुफळी, 44टक्के नागरिक म्हणाले- दहशतवाद्यांना मारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार वर्षांमध्‍ये सीरियात आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने ब-याच भागावर नियंत्रण मिळवले आहे.
वॉशिंग्टन : पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकन नागरिक खूपच घाबरले आहेत. इराक-सीरियातील दहशतवादी संघटना आयएसआयएसवरील(इस्लामिक स्टेट) कारवाईवरुन दोन गट पडले आहेत. एका सर्वेत 44 टक्के अमेरिकन म्हणतात, की अमेरिकेने सीरियात लष्‍कर पाठवले पाहिजे. दहशतवाद्यांना त्यांच्या क्षेत्रात जाऊन मारले पाहिजे. दुसरीकडे 45 टक्के नागरिकांनी लष्‍करी मोहिमेला विरोध दर्शवला आहे.
अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामा यांनी सध्‍या हवाई हल्ल्यांची मंजूरी दिली आहे. पॅरिसमधील हल्ल्यानंतर सामान्य अमेरिकन नागरिकांची मते जाणून घेण्‍यासाठी ब्लूमबर्गने एक सर्व्हे केला होता. तो बुधवारी(ता.18) जाहीर केला गेला होता. सर्व्हेत 1 हजार 2 नागरिकांची मते मोबाइल आणि सेलफोनवर जाणून घेतली.
निर्वासितांना विरोध :
> एका प्रश्‍नाच्या उत्तराला 53 टक्के अमेरिकन नागरिकांनी ओबामा यांची निर्वासितांच्या धोरणाला विरोध केला आहे.
> या धोरणानुसार 2016 पर्यंत सुमारे 10 हजारापर्यंत निर्वासितांना अमेरिकेत पुनर्वसन केले जाईल.
> या धोरणाला फक्त 28 टक्के लोकांनी विरोध केला आहे. शुक्रवारी (ता.12) पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यात एका हल्लेखोराच्या जवळ सीरियाचे पासपोर्ट सापडले होते.
सर्व्हेतील काही निरीक्षणे :
> 53 टक्के अमेरिकनांना वाटते, की आपल्या देशात इराक आणि सीरियातील निर्वासित येऊ नये
> 11 टक्के नागरिक म्हणतात, की अमेरिकेत फक्त सीरियातील ख्रिश्‍चन निर्वासितांना येऊ दिले पाहिजे. 8 टक्के अमेरिकन या धोरणाबाबत काही मत नोंदण्‍यास असमर्थ आहेत.
> 48 टक्के लोकांना विश्‍वास आहे, की अमेरिका पॅरिस सारख्‍या हल्ल्यांपासून पूर्णपणे सु‍रक्षित आहे. दुसरीकडे 46 टक्के लोकांना असे वाटत नाही. 6 टक्के लोकांनी आपले मत मांडण्‍यास नकार दिला.