आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जास्त पाणी प्यायल्यामुळे होऊ शकतो मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले समजले जाते. डॉक्टरही दररोज ८ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण फक्त तहान लागल्यावरच पाणी प्यावे, जास्त पाणी पिणे हे तुमच्या मृत्यूचे कारणही ठरू शकते, असे ऑस्ट्रेलियाच्या एका संशोधनात म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाच्या संशोधकांनी एका संशोधनानंतर हा दावा केला आहे. त्यानुसार, जास्त पाणी प्यायल्याने शरीरात विषारी घटक वाढू शकतात. वेळीच उपचार न मिळाल्यास ते प्राणघातकही ठरू शकते. अहवालात म्हटले आहे की, शरीरात पाणी होण्याचे संकेत मेंदूच देतो. त्यालाच तहान लागणे असे म्हटले जाते. तहान लागल्यावरच पाणी प्यावे. वेळापत्रक तयार करून पाणी पीत असाल तर अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त पाणी पितो. या संशोधनानुसार जास्त पाणी प्यायल्यास प्राणघातक वॉटर इन्टॉक्सिनेशन किंवा हायपोनेमेट्रिया होऊ शकतो.
त्यामुळे रक्तातील सोडियमची पातळी कमी होते, त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. गेल्या वर्षी जास्त पाणी पिल्याने अमेरिकेत एका ४७ वर्षीय ब्रिटिश महिलेचा मृत्यू झाला होता.
बातम्या आणखी आहेत...