आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्याही आधी भारतात होती धानाची शेती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लंडन - नुकत्याच लागलेल्या एका शोधात असा दावा करण्यात आला आहे की, भारतात भाताची शेती आम्ही आज विचार करतो त्याच्या कितीतरी पूर्वीपासूनच होत होती.

सिंधूच्या खोऱ्यातील संस्कृतीत पौराणिक ठिकाणी झालेल्या शोधाने हे कळले की भारतात तांदळाची शेती बहुधा चीनच्याही बरोबरीच्या काळात वा बरोबर त्यानंतर सुरू केली गेली होती. सिंधू खोऱ्यातील लोकांनी सर्वात आधी बहुपीक शेतीच्या किचकट प्रक्रियांचा प्रयोग केला होता. ते उन्हाळ्याच्या दिवसात तांदूळ, बीन आणि थंडीच्या हिवाळ्याच्या दिवसात गहू, डाळीसारख्या पिकांची शेती करत होते.

बनारस हिंदू विद्यापीठ आणि इंग्लंडमधील ऑक्सफाेर्ड विद्यापीठाच्या पुरातत्त्वज्ञांनी मिळून हा शोध लावला आहे. त्याच्या मतानुसार, भारतात सर्वात प्रथम तांदळाचा प्रयोग केंद्रीय गंगा खोऱ्यातील लाहुरादेव क्षेत्रात झाला होता. पण हे मानले जाते आहे की, दक्षिण आशियात सिंधू संस्कृतीच्या अंतापर्यंत तांदळाची शेती पोहोचलीच नव्हती आणि ही पीक रोपे इसवी सनापूर्वी २००० वर्षांआधी चीनमधूनच आणले गेले होते. पण आता हा नवा दावा करण्यात आला आहे. जर्नल्स अंॅटिक्विटी व जर्नल ऑफ आर्कियॉलॉजीकल सायन्समध्ये प्रकाशित या शोधात हादेखील दावा केला गेला आहे की, अधिक उत्पादन देणाऱ्या वेटलंॅड राइसला भारतात मोठ्या प्रमाणात स्वीकारले गेले, तथापि चीनने याची सुरुवात केली, पण शोधातून असे कळते की, हे तंत्र भारतात चीनच्याही पूर्वी प्रयोगरत होते. वा तसे प्रयोग होत होते.

दोन्ही हंगामांत पाऊस
सिंध प्रांतात उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही हंगामांमध्ये पाऊस होत असे. त्यामुळे तेथे प्राचीन इजिप्त आणि चीनच्या शांग राजघराणे या महत्त्वाच्या नागरी संस्कृतीआधीपासून हंगामी पिके अदलून-बदलून लावली जात असावीत, असे मत केंब्रिज विद्यापीठाचे कॅमेरॉन पेट्री यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...