आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधेसुधे पेंटिंग्ज नव्हे, या आहेत एका अंध कलाकाराने साकारलेल्या कलाकृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2001 सालापासून जॉन यांना पेंटर म्हणून ओळखले जाऊ लागले. - Divya Marathi
2001 सालापासून जॉन यांना पेंटर म्हणून ओळखले जाऊ लागले.
तुम्ही कधी डोळे बंद करून किंवा डोळ्यावर पट्टी बांधून एखाद्या कागदावर चित्र काढू शकता का. बरं चित्र सोडाच पण तुम्ही असे काही त्या कागदावर काढू शकाल का की, जे इतरांना ओळखता येईल.. नाही ना.. पण अमेरिकेच्या एका अवलिया कलाकाराने केवळ स्पर्शाच्या जाणीवेतून एकापेक्षा एक सरस अशी चित्रे साकारली आहेत. ही चित्रे पाहिल्यानंतर ती अंध कलाकाराने काढली असावीत यावर विश्वासही बसू शकणार नाही. पण ते खरे आहे. जॉन ब्रॅम्ब्लिट असे या कलाकाराचे नाव आहे.

वयाच्या आठव्या वर्षापासूनच जॉन यांच्या डोळ्याची हळू हळू कमी व्हायला लागली होती. त्यानंतर वयाच्या 30 व्या वर्षी ते पूर्णपणे नेत्रहीन बनले. पण तसे असले तरी उजेड किंवा अंधार याची जाणीव जॉनला होते. मात्र सामान्य व्यक्तीप्रमाणे ते पूर्णपणे पाहू शकत नाहीत. जॉनची या त्रासातून सुटका झाली नाही मात्र, त्यांनी तीच त्यांची शक्ती बनवली. त्यांनी स्वतःची एक शैली विकसित केली. त्याद्वारे ते स्पर्शाच्या मदतीने त्यांच्या भावना रंगांच्या माध्यमातून कॅनव्हावर उतरवतात. त्यांनी काढलेली चित्रे पाहिली तर ही एका नेत्रहीन कलाकाराची कलाकृती आहे यावर विश्वासच बसणार नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जॉन यांच्या काही अद्भूत कलाकृती आणि जाणून घ्या त्यांच्याबाबत...