आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर झालेल्या शस्त्रसंधी उल्लघनासंबंधी पाकिस्तानातील भारताचे कनिष्ठ राजदूत जे. पी. सिंह यांच्यावर समन्स बजावले होते. पाकच्या दोन नागरिकांचा यात बळी गेला असल्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. सार्कचे संचालक मोहंमद फैझल यांनी हे समन्स बजावले असून भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. 

भारत जाणीवपूर्वक येथील नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. भारताने २००३ च्या युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप फैझल यांनी केला. युनायटेड नेशन्स मिलिटरी ऑब्झर्व्हर ग्रुपला भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्णायक भूमिका घेण्यास भारताने मान्यता द्यावी, अशी मागणी फैझल यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समिती जाहीरनाम्यानुसार हा निर्णय असेल. भारताकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. २०१७ मध्ये भारताकडून ५९४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचा आरोप पाकने केला.
बातम्या आणखी आहेत...