आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK आर्मीने मीडियाला सांगितले, राजनाथ यांचे भाषण दाखवू नका, काय होते कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकच्‍या गृहमंत्र्यांचे भाषण माध्‍यमांनी दाखवले. मात्र, राजनाथ सिंह पाकवर निशाणा साधणार म्‍हणून त्‍यांचे भाषण दाखवण्‍यात आले नाही. - Divya Marathi
पाकच्‍या गृहमंत्र्यांचे भाषण माध्‍यमांनी दाखवले. मात्र, राजनाथ सिंह पाकवर निशाणा साधणार म्‍हणून त्‍यांचे भाषण दाखवण्‍यात आले नाही.
इस्लामाबाद- पाकिस्तानमध्‍ये नुकत्‍याच झालेल्या सार्क बैठकीचे मीडिया कव्‍हरेज न झाल्‍यामुळे हा मुद्दा वादात सापडला आहे. यासंदर्भातील नवीन खुलासा आता समोर आला आहे की, राजनाथ सिंह यांच्‍या भाषणाचे प्रक्षेपण थांबवण्‍याचे आदेश पाकिस्‍तान सरकारने नाही तर, तेथील लष्‍कराने दिले होते. इस्लामाबादमध्‍ये राजनाथ यांनी दहशतवादाच्‍या मुद्द्यावरून काही देशांना चांगलेच फटकारले होते. काश्मीरबाबत पाकची भूमिका आणि दहशतवाद्यांच्‍या धमक्‍या ही बाब किती गैर आहे, हे सिद्ध करण्‍यासाठी राजनाथ इस्लामाबादमध्‍ये गेले होते..
- पाकिस्तान लष्‍कराच्‍या जनसंपर्क विभागाने तेथील संपादक आणि पत्रकारांना सार्क बैठकीच्‍या वार्तांकनाबाबत आदेश दिले होते.
- राजनाथ भाषण देतील तो भाग वार्तांकनातून वगळण्‍यात यावा असे पत्रकारांना सांगण्‍यात आले होते.
- हिंदुस्तान टाइम्सच्‍या माहितीनुसार, पाकमधील सिनियर जर्नलिस्‍ट ताहिर नजमी यांनी या बाबीचा खुलासा केला आहे.
- दुस-या एका जर्नलिस्टच्‍या मतानुसार, पाक सरकार आणि लष्‍कर दोघांची अशी भूमिका होती की, या बैठकीला जास्‍त प्रसिद्धी मिळू नये.
- भारतासह कित्‍येक देश दहशतवादाचा मुद्दा उचलतील म्‍हणून पत्रकारांना याबाबत सूचना देण्‍यात आल्‍याचे कळते.
नवाझ यांना रद्द करायची होती सार्क बैठक
- नवाझ शरीफ हे पनामा पेपर्स लीकमध्‍ये त्‍यांच्‍या तीन फॅमिली मेंबर्सचे नावं आल्‍याने दबावात होते.
- इमरानची पार्टी तहरीक-ए-इंसाफ आणि जरदारींची पार्टी पीपीपी, नवाझ यांना राजीनामा मागत आहेत.
- या घरगुती वादामुळे नवाझ यांना सार्क बैठक रद्द करायची होती.
- मात्र, लष्‍करप्रमुख राहिल शरीफ यांच्‍याशी चर्चा झाल्‍यानंतर त्‍यांनी निर्णय बदलला.
- राहिल शरीफ यांचे म्‍हणने होते की, दहशतवादाच्‍या मुद्द्यावरून देश वेगळा पडला आहे.
- अशात सार्क बैठकही रद्द केली तर, त्‍याचा चुकीचा अर्थ काढला जाईल.
- याच कारणामुळे पाक लष्‍कर आणि सरकार यांनी ही बैठक घेतली मात्र, वार्तांकनावर बंधने आणली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...