आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK रेस्तराँमध्ये रोबोट बनला वेट्रेस; सर्व्ह करतोय फूड, ग्राहकांची झुंबड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानात पहिल्यांदा एक फास्टफूड रेस्तराँमध्ये रोबोट वेट्रेसचे काम करत आहे. मुल्तानमधील Pizza.com रेस्तराँमध्ये ग्राहकांना फूड सर्व्ह करण्यासाठी रोबोटचा वापर केला जात आहे. रेस्तराँचे मालकांचा मुलगा सैयद ओसामा अजीज याने हा रोबोट विकसित केला आहे. रोबोटिक वेट्रेसला पाहाण्यासाठी रेस्तराँबाहेर ग्राहकांची झुंबड उडाली आहे.

रिपोर्ट्सनुसार, शहरातील सर्व आउटलेटमध्ये अशाच प्रकारचे रोबोटिक वेटर ठेवण्याचा मानस रेस्तराँच्या मालकांनी व्यक्त केला आहे. यात भारतातील हैदराबाद येथील ब्रॅंडचा समावेश आहे.

मुलाने दिली बिझनेस आडिया...
- 'डॉन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रेस्तराँमध्ये वेट्रेसच्या रुपात रोबोटचा वापर होत असल्याने ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
- रोबोट विकसित करणारे ओसामा यांनी इस्लामाबादमधील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीतून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग विषयात पदवी घेतली आहे.
- रेस्तराँचे मालक अजीज अहमद जाफरी यांनी सांगितले की, रोबोट वेट्रेसचे वृत्त शहरात वार्‍यासारखे पसरले. त्यानंतर रेस्तराँच्या बाहेर ग्राहकांनी झुंबड उडाली.
- बिझनेसच्या विस्तारासाठी ओसामाने अनोखा फंडा शोधून काढल्याचे जाफरी यांनी म्हटले आहे.

रोबोट वेट्रेसचे वैशिष्ट्ये...
- अहमद जाफरी यांचे चिरंजिव ओसामा अजीज यांनी सांगितले की, रोबोट स्वयंसंचलित आहे. ग्राहकांचे स्वागत करतो. याशिवाय रोबोट ग्राहकांना सर्व्ह करतो.
- या रोबोटचे वजन 25 किलोग्रॅम आहे. 5 किलो जेवण वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. त्याच्या मार्गात एखादी व्यक्ती उभी असेल तर 'बाजुला व्हा', असेही रोबोट सांगतो.
 
रोबोटच्या गळ्यात बांधला आहे स्कार्फ
- ओसामा अजीज यांनी सांगितले की, रोबोटची बेसिक आइडिया त्यांना चीनमध्ये मिळाली. रोबोटचा पहिल्यांदा रेस्तराँमध्ये वापर केला जात आहे.
- त्याचा फीमेल बॉडी शेपमध्ये बसवला आहे. त्याच्या गळ्यात स्कार्फ बांधला आहे.
- रोबोटचे मॅकॅनिझम पाकिस्तानात बनवण्यात आलेआहे.
- रोबोटचे अद्याप नामकरण केले नसल्याचेही ओसामा अजीज यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, रेस्तराँमध्ये ग्राहकांना सर्व्ह करणार्‍या रोबोटचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...