आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौप्यस्फोट: लादेनवरील कारवाईमध्ये अमेरिकेचा बनेलपणा उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तान गुप्तहेर विभागाच्या एका अधिकाऱ्याने अल-कायदाचा प्रमुख आेसामा बिन लादेनच्या ठिकाण्याची खबर अमेरिकेच्या सीआयएला दिली होती. त्या बदल्यात त्याने अमेरिकेकडून २.५ कोटी डॉलर घेतले. आेसामाचा ठिकाणा देणाऱ्यांसाठी ही रक्कम बक्षीसस्वरूपात देण्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. आेबामा प्रशासनाने मात्र जगासमोर वेगळेच चित्र उभे केले होते. पाकला या मोहिमेची काहीच कल्पना नसल्याचे अमेरिकेने सांगितले. वास्तवात मात्र आयएसआय पाक सैन्याचे तत्कालीन प्रमुखांच्या सल्ल्यानेच हे अभियान तडीस नेले होते.
पाकमधील डॉन या दैनिकाने अमेरिकन शोध पत्रकार लेखक सेमुर एम. हर्श यांच्या रिपोर्टच्या आधारे हे वृत्त झाले आहे. हर्श सांगतात, सध्या तो पाकिस्तानी गुप्तहेर उच्चाधिकारी वॉशिंग्टनमध्ये वास्तव्यास असून सीआयएचा सल्लागार म्हणून काम करत अाहे. तो पाक सैन्याचा सदस्य होता. मात्र, त्याचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.
डॉनचावृत्तांत :ऑगस्ट २०१० मध्ये पाक गुप्तहेर उच्चाधिकाऱ्याने इस्लामाबादेतील सीआयए स्टेशन प्रमुख जोनाथन बँक यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पाकिस्तानातील अमेरिकी दूतावासातील सीआयए प्रमुखांच्या तो संपर्कात होता. वर्ष २००१ मध्ये अमेरिकेने आेसामाची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले होते. त्या रकमेच्या बदल्यात आेसामाची टीप देण्याचे त्याने मान्य केले, असे वृत्त डॉनने दिले आहे.

आेसामा पाक आयएसआयच्या संरक्षणात खैबर पख्तुनख्वा येथील अबोटाबाद येथे वास्तव्यास होता. तो येथे कैदी म्हणून वास्तव्यास होता, असा खुलासाही नव्या अहवालात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याविषयी सौदी अरब सरकारलाही माहिती होती. आेसामाला कैदी म्हणून ठेवा, असा सल्लाही सौदीने पाकला दिल्याचे आता निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, पाकिस्तानात अबोटाबाद शहरात मे २०११ मध्ये मारल्या जाण्याच्या काही महिने आधी अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याने त्याचे संपूर्ण लक्ष अमेरिकेवर केंद्रित केले होते. अमेरिकेत काही महत्त्वपूर्ण ठिकाणांवर हल्ले करण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने प्रयत्नही सुरू केले होते. तसेच पाकिस्तानसोबत युद्धबंदी कायम ठेवून अरब क्रांतीमधून पुढे आलेल्या जिहादी गटांसोबत त्याने संधान बांधले होते.

ही माहिती अमेरिकन सरकारने उघड केलेल्या कागदपत्रांमधून हाती लागली आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकन सरकारने न्यूयॉर्कमधील एका न्यायालयात आबिद नसीर नावाच्या पाकिस्तानी नागरिकावर सुरू असलेल्या खटल्यात ही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात ओसामाच्या अबोटाबादमधील घरातून जप्त डाटातील ई-मेल्सचा समावेश आहे.

हे ई-मेल्स त्याच्यातील तपशील बुधवारी वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यावर आधारित अहवालात म्हटले आहे की, एबोटाबादमध्ये लपलेल्या लादेनचे सगळे लक्ष्य अमेरिकेत प्रमुख ठिकाणांवर हल्ले करण्यावर केंद्रित होते. त्याचे म्हणणे होते की, छोट्या मोठ्या घटना किरकोळ हल्ले, हत्यांमधून काहीच साध्य होणार नाही. अमेरिकेला अफगाणिस्तानच्या तुलनेत व्हिएतनाम अनेक पट महागात पडले होते. अल कायदाच्या सहकाऱ्यांना १०० पट जास्त लोकांना मारावे लागेल, मोठे हल्ले करावे लागतील. तेव्हा कुठे व्हिएतनाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांची संख्येची बरोबरी होईल.

अहवालात म्हटले आहे की, अरब क्रांतीचा लाभ घेण्याचा प्रयत्न आेसामा करत होता. त्यासोबतच पाकिस्तानसोबत उत्तर आफ्रिकेतील शत्रूच्या गटांमध्ये स्थानिक पातळीवर युद्धबंदी करण्याचाही तो विचार करत होता. मृत्यूच्या काही आठवडे आधी आेसामाने म्हटले होते की, अमेरिकेमध्ये एका मोठ्या अभियानाची गरज आहे. ३० कोटी अमेरिकन तेथील सुरक्षा यंत्रणेला मुळापासून हादरवून सोडणारे ते असले पाहिजे. या कागदपत्रांमधून स्पष्ट होते की, त्याने अरब क्रांतीमधून अल कायदासाठी त्याने संधी शोधली होती त्याचा तो लाभ उठवू इच्छित होता.

अमेरिकेने जगाला खोटे चित्र दाखवले
आेबामाप्रशासनाने जगाला जे दाखवले ते कपोलकल्पित होते. वास्तवात ऑपरेशनची पद्धत फार वेगळी होती, असे हर्श सांगतात. तत्कालीन पाक लष्करप्रमुख जन. अश्फाक परवेझ कयानी आणि आयएसआय प्रमुख जन. अहमद शुजा पाशा यांना याविषयी काहीच माहिती नव्हती, हे साफ खोटे असल्याचे हर्श यांनी डॉनला सांगितले. पाकिस्तानला या मोहिमेसाठी अमेरिकेने राजी करवून घेतले होते.
अमेरिकेने संधीचा पुरेपूर फायदा घेतला
अमेरिकेनेस्वत:च्या प्रयत्नांनी आेसामाला शोधल्याचा दावा केला होता. मात्र, अधिकाऱ्याने दिलेल्या या वृत्तानुसार अमेरिकेने आेसामाच्या ठिकाण्यावर उपग्रहाद्वारे पाळत ठेवली. माहितीची पडताळणी केली. त्यानंतर आयएसआयला सूचित केले. त्यासाठी आयएसआयची मदत घेण्यात आली. गाझी तारबेला येथे आयएसआयचे सेल स्थापण्यात आले. येथे सील्सची एक व्यक्तीचा त्याच्या दोन सहकाऱ्यांसह सराव करण्यात आला. हल्ल्याची तालीमही झाली. सरावानंतरच प्रत्यक्ष ऑपरेशन हाती घेऊन ते पाकच्या सहकार्याने पूर्ण केले.