आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी ठरवले तर संबंध सुधारतील, नवाज यांचे काही खरे नाही : PAK मीडिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएम मोदींबरोबर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ. हा फोटो 27 मे 2014 चा आहे. फोटो काढण्याच्या एका दिवसापूर्वी नवाज मोदींच्या शपथ ग्रहण सोहळ्यात सहभागी झाले होते. - Divya Marathi
पीएम मोदींबरोबर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ. हा फोटो 27 मे 2014 चा आहे. फोटो काढण्याच्या एका दिवसापूर्वी नवाज मोदींच्या शपथ ग्रहण सोहळ्यात सहभागी झाले होते.
इस्लामाबाद - भारत-पाकिस्तान दरम्याच्या चर्चेला नव्याने सुरुवात झाल्याच्या मुद्यावर पाकिस्तानी मीडियाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘द डॉन’ वृत्तपत्रातील वृत्तानुसार पंतप्रधान मोदींनी ठरवले तर ते पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारू शकतात. पण पाकिस्तानचे पंतप्रदान नवाज शरीफ यांच्याबाबत मात्र तसे म्हणता येऊ शकत नाही. त्याचे कारण म्हणजे लष्कर नवाज यांच्या मार्गात अडथळा बनू शकते.

दोन महिन्यांत सुरू होणार चर्चा
- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ‘हार्ट ऑफ एशिया’ समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात गेली होती.
- त्यांच्या या व्हिजिटनंतर दोन्ही देशांमध्ये सर्व मुद्यांवर चर्चेबाबत एकमत झाले होते.
- 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर ही चर्चा थांबली होती.
- भारत-पाकच्या जॉइंट स्टेटमेंटमध्ये दोन देश दहशतवाद आणि काश्मीर सारख्या मुद्द्यांवर चर्चेला राजी झाले आहेत.
- त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह डायलॉग म्हटले जाते.
- दोन महिन्यांच्या आत दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांची बैठक होईल. त्याने चर्चेला सुरुवात होईल.

'द डॉन’ च्या एडियोरियलमध्ये मांडलेले मुद्दे
- भारत आणि पाकिस्तान इतिहास विसरून खरंच नाते सुधारण्याचा प्रयत्न करतील का? हा मोठा सवाल आहे. दोन्ही देशांमध्ये नात्यात कटुता आल्यानंतर अनेकदा सर्वकाही ठिक होणार असे वाटते. पण तसे झाले नाही. त्याचे कारण म्हणजे दोन्ही देशांचे नेतृत्तव. त्यात सत्यस्थितीऐवजी जनतेमध्ये अधिक लोकप्रिय मुद्द्यांना महत्त्व दिले जाते.
- आजचा विचार करता मोदींनी संबंध सुधारण्याचा निर्णय घेतला तर ते तसे करूही शकतात. पण नवाज शरीफ यांचे मात्र उलट आहे. ते इच्छा असली तरी तसे करू शकणार नाहीत. लष्कराची मदत मिळाली तरच ते पुढे सरकू शकतात. असे झाले तरच काही आशा ठेवता येऊ शकते.
चर्चेचा निर्णय घेणे सोपे, प्रत्यक्षात मार्ग कठीण : द ट्रिब्यून
- पाकिस्तानचे आणकी एक वृत्तपत्र ‘द ट्रिब्यून’ नुसार, अशा प्रकारच्या चर्चेचा निर्णय घेणे सोपे आहे पण प्रत्यक्षात अशा चर्चेतून फलित मिळवणे आणि चर्चा सुरू ठेवणे कठीण आहे.
- ज्या मुद्यांवर चर्चा व्हायची आहे, त्यापैकी एकही मुद्दा सोपा नाही. आतापर्यंत दोन्ही देशांना एकाही मुद्द्यावर तोडगा काढता आलेला नाही. त्याचे कारण म्हणजे फाळणीपासून सुरू झालेले वाच सुरुच आहेत. दोन्ही देशांना काही तरी मिळणार आणि काही तरी गमवावे लागणाले आहे.
जॉइंट स्टेटमेंटमध्ये भारताचे पारडे जड
भारताच्या बाजुने असलेले मुद्देपाकच्या बाजुने असलेले मुद्दे
1
स्टेटमेंटमध्ये दहशतवाद या शब्दाचा चार वेळा उल्लेख
संयुक्त निवेदनामध्ये जम्मू काश्मीर मुद्याचा समावेश.
2तीन महिन्यांपूर्वी भारताला चर्चेत दहशतवादाचा मुद्दा अजेंड्यावर हवा होता. त्यावेळी पाकिस्तानने माघार घेतली होती.सप्टेंबरमध्ये एनएसए स्तरावरील चर्चेत पाकिस्तानला काश्मीर मुद्दा अजेंड्यावर हवा होता. त्यावेळी भारताने तीव्र आक्षेप घेतला होता.
- स्टेटमेंटनुसार दोन्ही देश दहशतवादाचा निषेध करतात.
- दोन्ही देशांच्या एनएसएमध्ये दहशतवादावर चर्चा झाली होती.
- दोन्ही देश दहशतवाद संपवण्यासाठी झटत राहतील.
- दोन्ही देश काउंटर टेररिझमवर चर्चा करतील.
स्टेटमेंटनुसार जम्मू-कश्मीर सारख्जैया मुद्द्यांवर चर्चेचा अजेंडा ठरवण्यासाठी परराष्ट्मुर सचिव लवकरच भेटणार आहेत.
4
- पाकिस्तान मुंबई हल्ल्यातील आरोपींच्योंया विरोधातील खटले लवकर निकाली काढणार.
- मुंबई हल्ल्यांच्या नंतरही भारत पाकिस्तान दरम्यानची चर्चा रद्द झाली होती.
सियाचीन, सर क्रिक सारख्जैया मुद्द्यांवरही चर्चा होईल. पाकिस्तान याला मोठे यश समजत आहे.