आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak PM Nawaz Sharif Arrives On Three day Visit To Sri Lanka

नवाझ शरीफ यांचा श्रीलंका दौरा, अनेक करारांची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या श्रीलंका दौऱ्याला सोमवारी सुरुवात झाली. त्यांच्या या तीनदिवसीय दौऱ्यात उभय राष्ट्रांत अनेक करारांवर सहमती होण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि दहशतवादाला होणारे अर्थसाहाय्य रोखण्यासाठी विशेषत्वाने या दौऱ्यात चर्चा होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. विमानतळावर शरीफ यांचे स्वागत करण्यासाठी श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे उपस्थित होते. पाकचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांची मंगळवारी भेट घेतील.
२०१३ नंतर शरीफ यांची ही श्रीलंकेला पहिलीच भेट आहे. या भेटीदरम्यान आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापारविषयक करार होण्याची शक्यता आहे. व्यापारी प्रतिनिधी, मच्छीमार उद्योग, सिमेंट, ऊर्जा, शिक्षण व खाद्यान्न आदान-प्रदान करारांवरही स्वाक्षऱ्या होणार आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात शरीफ ऐतिहासिक शहर कँडीला भेट देतील. आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सेंटर आणि जिना हॉललाही ते भेट देणार आहेत. लंका-पाकिस्तान व्यूहात्मक संबंधांवर शरीफ यांच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले आहे. एप्रिल २०१५ मध्ये राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांनी पाक दौरा केला होता.