आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UN मधील स्वराज यांच्या प्रत्युत्तराने PAK अस्वस्थ, भारताचे आरोप निराधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- संयुक्त राष्‍ट्र संघात सुषमा स्वराज यांच्या पलटवारामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. स्वराज यांचे भाषण दिशाभूल करणारे व खोटे असल्याचे पाकिस्तानचे यूएनमधील प्रतिनिधी मलिहा लोधी यांंनी सांगितले. नवाज शरीफ यांचा यूएनमधील भाषणाच्या 5 दिवसानंतर सुषमा स्वराज यांनीसोमवारी रोखठोक उत्तर दिले. त्या म्हणाल्या, काश्‍मीर भारताचा हिस्सा आहे व राहील. पाकिस्तानने स्वप्न पाहणे सोडून द्यायला हवे. बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केल्याने पाकचा उडला भडका...
- युएनमधील पाकच्या प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी स्वराज यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना म्हणाल्या, भारताच्या परराष्‍ट्र मंत्र्यांचे आरोप खोटे व निराधार आहेत. त्यांचे आरोप चुकीचे आहेत.
- भारताकडून युएनमध्‍ये बलुचिस्तानचा मुद्दा उठवणे आंतरराष्‍ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे.
- काश्‍मीर भारताचा अविभाज्य भाग नाही व होणार नाही. काश्‍मीर मुद्दा वादग्रस्त असल्याचे सर्व मानतात.
- लोधी यांनी 'राईट टू रिप्लाय' चा वापर करत भारतावर निशाणा साधला.
- युएनच्या व्यासपीठावर काश्‍मीरमध्‍ये मानवी हक्कांचे भंग होत असल्याचा पाकिस्तानच्या आरोपाला उत्तर देताना सुषमा स्वराज म्हणाल्या, ज्यांचे घर काचेचे असते त्यांनी दुस-यांच्या घरावर दगड फेकू नये' .
नवाज यांचा सल्लागार म्हणाले, पाकिस्तानला भारत वेगळा पाडू शकला नाही
- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्‍ट्र व्यवहाराचे सल्लागार सरताज अजीज म्हणाले, की पाकिस्तानला राजनैैतिक पातळीवर वेगळे पाडण्‍याचा भारताच्या प्रयत्नाला अपयश आले आहे.
- डॉन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, अजीज म्हणाले, की 56 देशांची संघटना इस्लामिक कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन(आयसीओ), यूएन आणि जगातील इतर अनेक संस्था पाकिस्तानला काश्‍मीरसंबंधी पाठिंबा देत आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, यूएनमध्‍ये सुषमाने शरीफला कसे दिले प्रत्युत्तर...
बातम्या आणखी आहेत...