(फोटो- पूर्व पाकिस्तानमध्ये (बांगलादेश) पश्चिम पाकिस्तानच्या लष्कराने नागरिकांचा असा अतोनात छळ केला.)
3 डिसेंबर 1971 रोजी भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तानात असलेल्या पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्ला चढवला होता. पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानमधील जनतेवर अमानुष अत्याचार चालवला होता. त्यामुळे भारताला पाकिस्तानी लष्करावर हल्ला करावा लागला होता.
1965 च्या युद्धानंतर ही दुसरी वेळ होती, जेव्हा दोन्ही देशांचे लष्कर समोरासामोर आले होते. अमेरिकेने दिलेल्या धमकीला भीक न घालता भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले होते. यावेळी अमेरिकेने बंगालच्या खाडीत नौदलाची सातवी फ्लिट भारताला भीती दाखवण्यासाठी तैनात केली होती.
अखेर बांगलादेश स्वतंत्र झाला
1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेले युद्ध बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या स्वरुपात लढण्यात आले. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांमध्ये विभागले गेले होते. पूर्व भागातील पाकिस्तानवर पश्चिम भागातील नेत्यांचा अंमल चालत होता. त्यांच्यावर भाषेसंदर्भात आणि सांस्कृतिक बंधने लादण्यात आली होती. याविरुद्ध पूर्व पाकिस्तानमध्ये निदर्शने करण्यात येत होती. याला प्रतिबंध घालण्यासाठी पाकिस्तानी सरकारने लष्कराला खुली छुट दिली होती.
दोन लाख महिलांवर बलात्कार
पूर्व पाकिस्तानच्या अवामी लीगचे नेते शेख मुजीर्बूर रहमान यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली होती. सर्वसामान्य जनतेवर अमानुष अत्याचार करण्यात येत होते. खुलेआम नागरिकांना ठार मारले जात होते. महिलांवर सामुहिक बलात्कार करण्यात येत होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी तब्बल 2 लाख महिलांवर बलात्कार केला. या संघर्षात 20 ते 30 लाख नागरिक ठार झाले. 80 लाख ते एक कोटी नागरिकांनी भारतात शरणागती घेतली होती.
सगळ्यात लहान युद्ध
13 दिवस चाललेल्या युद्धात पाकिस्तानी लष्कराने 16 डिसेंबर रोजी शस्त्रे खाली टाकली. भारतीय लष्कराने सुमारे 90 हजार पाकिस्तानी जवानांना युद्धबंदी केले होते. याला सर्वांत कमी काळासाठी चाललेल्या युद्धाच्या स्वरुपात बघितले जाते.
पुढील स्लाईडवर बघा, पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानमधील जनतेवर कसा अमानुष अत्याचार केला... महिलांवर बलात्कार केले....