आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Blames To India For Delay In Bilateral Talks

द्विपक्षीय चर्चा लवकर सुरू व्हावी, भारताकडून उशीर होत असल्याने पाकला आश्चर्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - भारतासोबतच्या परराष्ट्र स्तरावरील चर्चेला होत असलेल्या विलंबाबाबत आश्चर्य व्यक्त करत ही चर्चा लवकरात लवकर सुरू करण्याची पाकिस्तानने मागणी केली आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांच्या मते, परराष्ट्र सचिव स्तराच्या चर्चेसाठी होत असलेला विलंब आश्चर्यजनक आहे. चर्चा सुरू झाल्यास गरिबी, निरक्षरता आणि असमानता दूर करण्याबाबत गंभीर चर्चा होऊ शकते. शनिवारी लाहोरमध्ये बैसाखीच्या मुहूर्तावर आयोजित कार्यक्रमात ते बोलते होते. अजीज पुढे म्हणाले, भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी ३ मार्च रोजी पाकिस्तानचा दौरा केला. तो एक सद््भावना दौरा होता. त्यामुळे औपचारिक चर्चा अद्याप सुरूच झालेली नाही. २०१३ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध बनवण्याविषयी सांगितले होते. याच धोरणानुसार ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथग्रहण समारंभास उपस्थित झाले होते, असेही अजीज यांनी या वेळी सांगितले. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची भेट घेतल्याने भारताने परराष्ट्र स्तरावरील चर्चा रद्द केली होती.