आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Cancelled Indo Pak Business Forum Due To Security Reasons

भारतात धोक्याचे कारण सांगत पाकने रद्द केली, Indo-Pak Forum

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो प्रतिकात्मक. - Divya Marathi
फोटो प्रतिकात्मक.
नवी दिल्ली - पाकिस्तानने या महिन्याच्या अखेरीस होणारी इंडो-पाक बिजनेस फोरमची बैठक रद्द केली आहे. पाकिस्तानच्या मते भारतात त्यांच्या उच्च स्तरीय शिष्टमंडळाला हिंदु कट्टरतावादी संघटनांकडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या नवाज शरीफ सरकारने भारतालाही फोरमची बैठक रद्द झाल्याचे कळवले आहे. मात्र नव्या तारखांबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

बैठक रद्द करण्यामागचे कारण...
पाकिस्तान हाय कमिशनच्या एका अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला नाव न सांगण्याच्या अटीवर फोरम रद्द झाल्याची माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याच्या मते नुकताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान, माजी परराष्ट्र सचिव खुर्शीद महमूद कसूरी आणि पाकिस्तानच्या कलाकारांना शिवसेनेने विरोध केला होता. गझल गायक गुलाम अली यांनी तर कॉन्सर्ट रद्द केला होता.

बासीत यांनी दिला होता इशारा
भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी काही दिवसांपूर्वीच ही बैठक रद्द झाल्याचे संकेत दिले होते. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्टच्या एका कार्यक्रमात बुधवारी बासितने म्हटले होते की, जोपर्यंत दोन देशांमध्ये राजकीय परिस्थ्ती सुधारणार नाही तोपर्यंत आर्थिक स्थिती सुधारणेही अवघड आहे.

भारताने सांगितले खरे कारण
भारत सरकारच्या सुत्रांनुसार, जेव्हापासून भारताने पाकिस्तानवर दहशतवादी संघटनांवर कारवाईबाबत दबाव आणला आहे तेव्हापासून पाकिस्तान इनटॉलरन्सला मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हा मुद्दाही याच्याशीच संबंधित असू शकतो. एक कारण हेही असू शकते की, भारताने पाकिस्तानबरोबर होणारी क्रिकेट मालिका रद्द केली. भारताने इस्लामाबादेत अफगाणिस्तानात होणाऱ्या संमेलनाबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

या बैठकीचे आयोजन 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये करण्यात आले होते. त्यामध्ये दोन्ही देशांचे 15 बिझनेस लीडर्स सहभागी होणार होते. भारताकडून हिरो मोटोकॉर्पचे सुनीलकांत मुंजाळ आणि पाकिस्तानकडून सय्यद यावर अली या बैठकीचे नेतृत्त्व करणार होते.