आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अल्ला’ म्हटल्याने पाकिस्तानी दांपत्यास विमानातून उतरवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकागो - ‘अल्ला’ म्हटल्यामुळे मूळच्या पाकिस्तानी वंशाच्या एका अमेरिकन दाम्पत्यास डेल्टा एअरवेज कंपनीने विमानातून उतरवल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत दाम्पत्याने केलेल्या दाव्यानुसार त्यांनी ‘अल्ला’ म्हटल्यामुळे तसेच फोनवर एसएमएस केल्यामुळे एक क्रु मेंबर अस्वस्थ होती. ही घटना २६ जुलैरोजी घडली होती. फैसल अली व नाजिया हे दाम्पत्य त्यांच्या लग्नाचा १० वर्धापनदिन साजरा करून पॅरिस येथून ओहियो प्रांतातील सिनसिनाटीला जात होते. विमानात बसल्यानंतर महिलेने बूट उतरवले व तिच्या नातेवाईकांना एसएमएस पाठवला. या दाम्पत्याबाबत एका क्रू मेंबरने पायलटकडे संशय व्यक्त केला. ही महिला डोक्याला स्कार्फ बांधून फोनचा वापर करत आहे. तसेच तिने फोन लपवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार तिने केली. हे दाम्पत्य “अल्ला’’ म्हणत असल्याचे तिने सांगितले. त्यांनी आम्हाला उतरवण्याचे कारण सांगा असे पायलटला म्हटले. पण त्यांनी कारण सांगितले नाही. त्यानंतर पायलटने त्या दोघांना खाली उतरवले व विमान रवाना झाले. विमान कंपनीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...