आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Denied Permission To Investigate Maulana Masood Azher

पठाणकोट हल्ला : PAK ची पलटी, भारताला नाकारली मसूदच्या चौकशीची परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर...(फाइल फोटो) - Divya Marathi
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर...(फाइल फोटो)
लंडन/इस्लामाबाद - पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड मौलाना मसूद अझहरच्या संयुक्त चौकशीची परवानगी देता येणार नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कालच गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले असताना सुत्रांनी मात्र त्याच्या उलट माहिती दिली आहे.

भारताच्या मागणीवर पाकची पलटी
- पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द नेशन’ ने पाकिस्तान सरकारमधील सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले.
- या वृत्तानुसार, पाक सरकारचा एक अधिकारी म्हणाला की, भारताने मसूद अझहर आणि त्याच्या भावाच्या चौकशीची मागणी केली होती. पण आम्ही अगदी नम्रपणे नकार दिला आहे.
- अधिकारी म्हणाला, भारत आमच्यावर मसूद अझहरला ताब्यात देण्यासाठी दबाव आणत आहे. आम्ही त्याला अनेकदा नकारही दिला आहे. आता त्यांना अझहरची चौकशी करायची आहे. पण आम्ही त्याचीही परवानगी देऊ शकत नाही.
- हा अधिकारी असेही म्हणाला होता की, जेव्हा इस अफसर आम्ही भारताला या सर्वांच्या विरोधात कारवाई करणयाचे आश्वासन दिलेले असूनही अशा प्रकारची मागणी का होत आहे हेच कळत नाही.

रविवारी नवाज शरीफ यांनी दिले होते आश्वासन...
- नवाज शरीफ यांनी रविवारी लंडनंध्ये म्हटले होते की, त्यांनी नरेंद्र मोदींशी चर्चा केली आहे. दोन्ही देश एकमेकांच्या मदतीने पठाणकोट हल्ल्यातील दोषींवर कारवाई करतील.
- शरीफ म्हणाले की, पाकिस्तानला हवे असते तर आम्ही भारताने दिलेल्या पुराव्याचा मुद्दा लपवला असता. पण आम्हाला भारताकडून नवे पुरावे मिळाले आहेत हे आम्ही स्पष्टपणे सांगत आहोत.
- बराक ओबामांनी रविवारी पाकिस्तानच्या पठाणकोट हल्ल्यातील दोषी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती.

पाकने उचललेली पावले...
- दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमहून परतताना शरीफ म्हणाले की, भारताकडून मिळालेल्या पुराव्यांची तपासणी केली जात आहे. आम्ही आरोपींना कायद्याच्या सीमेत आणणार आहोत.
- शरीफ म्हणाले, आम्ही एक स्पेशन इनव्हेस्टीगेशन टीमही तयार केली आहे. ही टीम भारतात जाइल आणि त्याठिकाणाहून पुरावे एकत्र करेल. दहशतवादाच्या विरोधात आमची लढाई सुरू राहील.
- पाकिस्तानी पंतप्रधान पुढे म्हणाले की, मी नरेंद्र मोदींशी चर्चा केली आहे. मोदींनी दोषींवर कारवाईसाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. आम्ही योग्य मार्गाने पुढे जात आहोत. त्यामुळे दोषींनी शिक्षा दिली जाईल अशी आम्हाला आशा आहे.
- भारताने ठोस कारवाई करण्यासाठी पुरेशी माहिती पुरवली आहे. पाकिस्तानचे एनएसए नसीर खान जंजुआ आणि भारताचे एनएसए अजित डोभाल यांच्यातही या मुद्द्यावर 5 जानेवारीला चर्चा झाली होती.

ना अटक ना नजरकैद
पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझहरला पाकिस्तानने अटक केलेलीच नाही. तसेच त्याला नजरकैदेतही ठेवण्यात आलेले नाही. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या ज्या तीन जणांना लाहोरमधून अटक करण्यात आली आहे, प्रत्यक्षात त्यांचा हल्ल्याशी काहीही संबंध नाही.

भारतीय गुप्तचर संस्थांच्या रिपोर्टमध्ये झाला होता खुलासा
- पाकने अझहर किंवा जैशच्या विरोधात खटला दाखल केलाच नाही.
- जैशच्या ज्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर केवळ जिहादी साहित्य बाळगल्याचा आरोप आहे.
- अधिकाऱ्यांच्या मते, मसूदला अटक केल्याच्या खोट्या बातम्या काही पाकिस्तानी एजन्सींनी पसरवलेल्या होत्या. भारताचे लक्ष विचलित करण्याचा तो प्रयत्न होता.
- पंजाबचे कायदेमंत्री राणा सनउल्लाह यांनीही पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीसाठी तयार केलेल्या जॉइंट इनव्हेस्टीगेशन टीमचे काम पूर्ण होईपर्यंत कोणतीही माहिती दिली जाणार नसल्याचे म्हटले आहे.