आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Denies Statement Of Obama About Terrorism An Pakistan

दहशतवाद्यांच्या नंदनवनाबाबत आेबामांचे वक्तव्य पाकिस्तानने फेटाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - आगामी दशकात पाकिस्तान होईल. त्यामुळे प्रादेशिक अशांतता निर्माण होऊ शकते, या राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्या वक्तव्याला पाकिस्तानने फेटाळून लावले आहे.

मंगळवारी संसदेसमोरील अखेरच्या भाषणात आेबामा यांनी प्रदेशात आगामी दहा वर्षे अशांतता राहील, असे भाकीत केले होते. आेबामांचे म्हणणे केवळ त्यांचे वैयक्तिक भाकीत असू शकते; परंतु त्याचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील वास्तवाशी कसलाही संबंध नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्र संबंध सल्लागात सरताज अझिझ म्हणाले. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधातील लढाईत सक्रिय आहे. त्यानुसार देशातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम सुरू आहे.एवढेच नव्हे, तर देशाने सातत्याने यासंदर्भात कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच नजीकच्या दिवसांत देशात स्थैर्य दिसेल. मध्यपूर्व, अफगाणिस्तान, पाकिस्तान, अमेरिका, आफ्रिका, आशियातील काही भागात ही अशांतता जाणवू लागेल. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आगामी काळात दहशतवादी धोक्यांवर केंद्रित असले पाहिजे.

सध्या इस्लामिक स्टेट, अल-कायदाची दहशत आहे; परंतु जगाच्या काही भागात आयएसचा प्रभाव नसतानाही अस्थैर्य राहणार आहे, असे त्यांनी भाषणातून म्हटले होते.