आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Ensures US About Action Against Hafiz Saeed

हाफीज सईद, लश्करविरोधात कारवाई करणार, पाकचे अमेरिकेला आश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ. - Divya Marathi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ.
वॉशिंग्टन - मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड हाफीज सईद आणि लश्कर ए तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन पाकिस्तानने अमेिरकेला जिले आहे. अमेरिकेने बुधवारी भारताच्या विरोधातील पाकिस्तानची तक्रार फेटाळून लावली. त्याचबरोबर पाकिस्तानला दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्याचा सल्लाही दिला. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याचा कट लश्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने रचला होता. सईदला युनायटेड नेशन्सनेही दहशतवादी ठरवले आहे. पुण पुरावे नसल्याचे सांगत पाकिस्तानने वारंवार त्याच्यावर कारवाई करणे टाळले आहे.

पाकिस्तानने दिलेले आश्वासन
>अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची गुरुवारी रात्री भेट झाली. त्यानंतर एक जॉइंट स्टेटमेंट जाहीर करण्यात आले. त्यात पाकिस्तानच्या या आश्वासनाचाही उल्लेख आहे. तर भारताने सीमेवरील तणाव निवळण्यासह महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चेसाठी राजी व्हावे यासाठी अमेरिकेकडून मदतीचे आश्वासनही घेतले.
>या सामुहिक निवेदनानुसार दोन्ही देशांनी लाइन ऑफ कंट्रोलवर सुरू असलेल्या अशांतीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी दोन्ही देशांच्या मर्जीनुसार भारत-पाक दरम्यान एकमेकांबाबत विश्वास वाढावा अशी पावले आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांची गरज व्यक्त केली. स्टेटमेंटमध्ये शस्त्रसंदी तोडण्यासाठी भारत किंवा पाकिस्तानला दोष देण्यात आलेला नाही.
>स्टेटमेंटनुसार अमेरिका आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी भारत-पाकदरम्यान ठोस चर्चेची प्रक्रिया सुरू ठेवण्याच्या मुद्यावरही जोर दिला.
>शरीफ यांनी ओबामांना पाकिस्तान युनायटेड नेशन्सकडून घोषणा करण्यात आलेले दहशतवादी आणि संघटनांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासनही दिले. पाकिस्तानच्या या आश्वासनामुळे आता आंतरराष्ट्रीय कम्युनिटीची नजर हाफीज सईदवर आहे.

हस्तक्षेपाला अमेरिकेचा नकार
अमेरिकेने दोन्ही देशांमध्ये हस्तक्षेप करण्यास वारंवार नकार दिलेला आहे. दोन्ही देशांनी आपसांत चर्चा करून हा मुद्दा सोडवावा असे अमेरिकेचे मत आहे. पाकिस्तानने मात्र काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. पाकिस्तानातील अशांतीचे खापर भारताच्या डोक्यावर फोडायचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. भारताने मात्र नेहमीच पाकिस्तानमधील स्थिती तेथील सरकारने दहशतवाद्यांना बळ दिल्याने झाले असल्याचे म्हटले आहे.

पुराव्यांमुळे पाकची तोंडावर आपटी
पाकिस्तानने भारताच्या विरोधात नेलेल्या पुराव्यांबाबत अमेरिकेने काहीही रस दाखवलेला नाही. बुधवारी यूएस सेक्रेटरी ऑफ स्टेट जॉन केरी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात मिटींग झाली होती. यामध्ये पाकिस्तानने तीन पुरावे सोपवले. जॉन केरी मात्र त्यातील आरोपांशी सहमत नसल्याचे दिसून आले. स्टेट डिपार्टमेंटच्या डेली ब्रिफींगमध्येही त्याला उल्लेख नव्हता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS