आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेकडे RAW ची तक्रार करणार पाक, भारताविरोधात आखली योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी पाकिस्तान एक कास योजना तयार करत आहे. त्यासाठी पाकिस्तानने त्यांचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांना अमेरिकेच्या दौऱ्यावर पाठवले आहे. चौधरी हे ओबामांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत. त्यावेळी ते भारताची गुप्तचर संस्था रॉ च्या विरोधात तक्रार करणार आहेत. पाकिस्तानने भारतावर पाकिस्तानात दहशतवादाला प्रेरणा देऊन अशांती पसरवण्याचा आरोप लावला आहे. चौधरी म्हणाले की, पाकिस्तानातील अनेक दहशतवादी घटनांमध्ये RAW चा हात आहे. भारताने मात्र वेळोवेळी हा आरोप फेटाळला आहे.

पर्रिकर यांचे वक्तव्यही उचलून धरणार
पाकिस्तानचे वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे वक्तव्यही उचलून धरू शकतात. त्यात त्यांनी दहशतवादाद्वारे दहशतवाद संपवण्याची भाषा केली होती. पाकिस्तान सरकारने म्हटले आहे की, पर्रिकर यांचे हे वक्तव्य भीती निर्माण करणारे आहे. तसेच भारतीय गुप्तचर संस्था पाकिस्तानात दहशतवादाला चालना देत असल्याचे स्पष्ट होते, असेही पाकचे म्हणणे आहे. चौधरी यांच्याबरोबर एक शिष्टमंडळही अमेरिकेला जात आहे. ते वॉशिग्टनमध्ये पाकिस्तान-अमेरिका यांच्यातील चर्चेत सहभागी होईल.

पाक-चीन आर्थिक मैत्रीमुळे भारत त्रस्त
त्यापूर्वी एका दिवसापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज म्हणाले होते की, अंतराष्ट्रीय स्तरावर आम्ही भारताचे पितळ उघडे पाडणार आहोत. भारत पाकिस्तान-चीन मधील आर्थिक संबंधांना नुकसान पोहोचवण्याच्या विचारात आहे, असेही ते म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनचे प्रकल्प हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. या संपूर्ण परिसरावर ताबा मिळवण्याची भारताची इच्छा आहे. 1998 मध्ये पाकिस्तानने अणुचाचणी केल्यानंतर मात्र भारताची स्वप्ने धुळीस मिळाली.