आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील महिन्यात भारत-पाकिस्तानच्या परराष्‍ट्र सचिवांची बैठक, संबंध सुधारणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : भारत-पाकिस्‍तानमधील संबंध पुन्हा पूर्वपदावर येताना दिसत आहे. सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तान दौ-यानंतर दोन्ही देशांच्या परराष्‍ट्र सचिवांची पुढील महिन्यात चर्चा होणार आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्‍ट्र मंत्रालयाने दिली आहे.
का दोन्ही देशांमधील चर्चा सुरु होत आहे?
बुधवारी परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी इस्लामाबादमध्‍ये दोन्ही देशांमधील समग्र संवादाची फेरी पुन्हा सुरु होणार असल्याची घोषणा केली होती. 2008 मध्‍ये मुंबई हल्ल्यानंतर चर्चाचे सत्र थांबवले गेले होते. स्वराज या पाकिस्तानमध्‍ये हार्ट ऑफ एशिया परिषदेत सहभागी होण्‍यासाठी इस्लामाबादला गेल्या होत्या.
काय आहे समग्र संवाद?
- यानुसार भारत-पाकिस्तान दरम्यान दहशतवाद, व्यापार, सर क्रीक, काश्‍मीरसह इतर मुद्द्यांवर चर्चा होईल.
- सुषमा स्वराज यांनी यास कॉम्प्रिहेन्सिव्ह बायलॅटरल डायलॉग (समग्र संवाद) असे नाव दिले आहे.
- त्याच्या मतानुसार या पूर्वी कंपोझिट डायलॉग आणि 2008 नंतर रिझूम्ड डायलॉग असे म्हटले जात होते.
- 1998 मध्‍ये कंपोझिट डायलॉगच्या फे-या सुरु झाल्या होत्या. 2008 मध्‍ये मुंबई हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संवाद प्रक्रिया थांबली होती.
बातम्या आणखी आहेत...