आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan Insists Its Nuclear Programme Is Focused On Dealing With India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताकडून संभाव्य हल्ल्याचा निपटारा हाच अण्वस्त्र शक्तीचा उद्देश, पाकची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिग्टन - भारताकडून अणुहल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर देणे हाच आपल्या अणु कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. भारताच्या तुलनेत त्यांच्याकडे असलेला पारंपरीक शस्त्रांचा साठा, यातील तफावतीचीही पाकने चिंता व्यक्त केली आहे. वॉशिग्टनमध्ये अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सेक्युरिटी, स्ट्रॅटेजिक एबिलिटी अँड नॉन प्रोलिफिरेशन वर्किंग ग्रुपची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर हे निष्कर्ष समोर आले.

'द डॉन'च्या वृत्तानुसार मुताबिक, बैठकीत पाकिस्तानने अमेरिकेला सांगितले आहे की, त्याच्या अणु कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा भारताकडून होणाऱ्या संभाव्य अणु हल्ल्याचा निपटारा करणे हाच आहे. त्यामुळे जेव्हा त्यांची भीती दूर होईल तेव्हाच कोणत्याही आंतरराष्ट्रीय अणुकरारावर सही करण्याची तयारी असल्याचे पाकस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानने अण्वस्त्रांची संख्या कमी करण्यासही नकार दिला आहे. मात्र, त्याचवेळी अणुचाचणी दुसऱ्यांदा सुरू करणारा दुसरा देश पाकिस्तान ठरणार नाही, असे आश्वासनही पाकिस्तानने अमेरिकेला दिले आहे. अणुऊर्जा ही केवळ शांततेसाठी वापरणे यालाच प्राधान्य असल्याचेही पाकने म्हटले आहे.

भारत-अमेरिका अणु नागरी करारावर नजर
अमेरिका आणि पाकिस्तान दरम्यान या बैठकीत अनेक संवेदनशील मुद्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याशिवाय भारत आणि पाक यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्याच्या पद्धतींवरही चर्चा झाली. बैठकीच्या एक दिवसापूर्वी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी वॉशिग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेत पाकिस्तान, अमेरिका आणि भारतादरम्यान झालेल्या नागरी अणुकरारात सहभागी होण्याचा दावेदार असल्याचे म्हटले होते.