आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान जगासाठी सर्वात धोकादायक देश, सीआयएचे माजी अधिकारी केविन हल्बर्ट यांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढता दहशतवाद, सर्वात वेगाने होणारा अण्वस्त्रांचा साठा, सर्वाधिक लोकसंख्या असणारा जगातील सहावा देश आणि जगातील सर्वाधिक जन्मदर असलेल्या देशांपैकी एक यामुळे पाकिस्तान हा देश संपूर्ण  जगासाठीच धोकादायक आहे, असा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएचे माजी अधिकारी केविन हल्बर्ट यांनी केला आहे. 
  
केविन हल्बर्ट हे इस्लामाबादमधील सीआयएचे माजी स्टेशन प्रमुख आहेत. त्यांनी गुप्तचर विभागासाठी असलेल्या सायफर ब्रीफ या संकेतस्थळावर एक लेख लिहिला असून त्यात हे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान अपयशी ठरला तर त्याचे जगावर विपरीत परिणाम होतील, असा इशारा देऊन हल्बर्ट म्हणाले की, पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोसळल्यास मोठ्या अर्थव्यवस्थांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती कोसळू न देण्यातच सर्वांचे हित आहे.   एखादी मोठी बँक बुडाल्यास अर्थव्यवस्थेवर जेवढा परिणाम होईल त्यापेक्षाही मोठा परिणाम पाकिस्तान कोसळू दिल्यास होईल. त्यामुळेच अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला अब्जावधी डॉलर दिले आहेत. 
 
अफगाणमधील हेतू मर्यादित 
हल्बर्ट म्हणाले की, अफगाणिस्तान तालिबानींच्या हातात जाऊ नये, दहशतवाद्यांसाठी स्वर्ग ठरू नये, एवढाच हेतू आहे. हे दहशतवादी पाश्चिमात्य देशांवर हल्ला करण्याची योजना आखू शकतात. आम्ही तेथे आणखी जास्त काळ राहिलो तर अमेरिकेच्या जवानांना प्राण गमवावेच लागतील.
बातम्या आणखी आहेत...