इंटरनॅशनल डेस्क - संयुक्त राष्ट्रसंघात(यूएन) सुषमा स्वराजच्या पलटवारामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. यूएनमध्ये पाकिस्तानच्या कायम प्रतिनिधी मलिहा लोधीने मंगळवारी स्वराज यांचे भाषण निराधार असल्याचे सांगितले आहे. काश्मीरला भारताचा अविभाज्य हिस्सा सांगणा-या स्वराजचे दावा खोटा असल्याचे लोधी म्हणाल्या. मलीहा लोधी या पाकिस्तानच्या कर्तृत्ववान राजनयिक अधिकारी व शक्तिशाली महिलांमध्ये गणल्या जातात. यूएन प्रतिनिधीची जबाबदारी सांभाळणा-या पाकच्या पहिला महिला अधिकारी...
- पत्रकार असलेल्या मलीहा लोधी डिप्लोमॅट बनल्या. 2014 मध्ये पाकिस्तानने यूएनमध्ये कायम प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले.
- यूएनमध्ये कायम प्रतिनिधीत्वाची जबाबदारी सांभाळणा-या त्या पाकिस्तानच्या पहिल्या महिला आहेत.
- यापूर्वी त्या दोन वेळेस अमेरिकेत पाकिस्तानच्या राजदूत राहिल्या आहेत व ब्रिटनमध्ये उच्चायुक्त राहिल्या आहेत.
- मलीहा लोधी यूएन सेक्रेटरी जनरलच्या नि:शस्त्रीकरण प्रकरणी स्थापन केलेल्या सल्लागार मंडळाच्या सदस्य राहिल्या आहेत.
- 2015 मध्ये लोधी युनिसेफच्या कार्यकारी मंडळात अध्यक्ष पदावरही राहिल्या आहेत.
- मलीहा हॉर्वर्डच्या केनेडी स्कूलच्या इन्स्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्समध्ये रेझिडेन्स फेलोही राहिल्या आहेत.
- त्यांनी पाकिस्तानवर दोन पुस्तके लिहिली एक ' पाकिस्तान्स एनकाऊंटर विथ डेमोक्रेसी व दुसरे 'पाकिस्तान बियॉण्ड द क्रायसिस'.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...