आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दबावासाठी पाण्याचा वापर केला जाऊ नये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे - कुठलाही दबाव आणण्यासाठी पाण्याचा वापर शस्त्राच्या रूपात केला जाऊ नये, असा इशारा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांत सिंधू पाणी करारावरील चर्चेदरम्यान दिला. शांतता, सुरक्षा आणि पाणी या मुद्द्यावर झालेल्या खुल्या चर्चेच्या वेळी पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी आपल्या भाषणात जगभरातील पाणी करारांचा हवाला दिला.

लोधी म्हणाल्या की, कोणता देश पाणी कराराच्या अंमलबजावणीत दिरंगाई करत आहे यावरही आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष ठेवण्याची गरज आहे. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय आराखडे तयार करून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारीही घ्यायला हवी. विविध देशांनी परस्पर सहमतीने पाण्यासंबंधीचे प्रश्न सोडवावेत हेही निश्चित केले जावे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे की, पाण्याला सहकार्याचा वाहक अशा स्वरूपात विविध देशांनी त्याचा वापर करावा. गेल्या सात दशकांत जगभरात झालेल्या २०० पाणी करारांचे उदाहरण देऊन ते म्हणाले की, याबाबत आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे, पण विविध देशांदरम्यान झालेले करार वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. हा वाद सोडवण्यासाठी देशांनी विविध मार्ग काढले आहेत.
बातम्या आणखी आहेत...