आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK च्या शाहीन-3 ची यशस्वी चाचणी, भारतीय अग्नि-4 मात्र सरसच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्‍लामाबाद - पाकिस्तानने शुक्रवारी अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या शाहीन-3 क्षेपणास्त्राची चाणी केली. हे क्षेपणास्त्र 2750 किमी रेंजपर्यंत हल्ला करू शकते. म्हणजेच भारताचा कोणताही भाग याच्या रेंजबाहेर नाही. पण असे असले तरी भारताच्या अग्नि 4 बरोबर ते स्पर्धा करू शकणार नाही. अग्नि-4 ची रेंज 4000 किमीपर्यंत आहे. अग्नि 20 मिनिटांमध्ये संपूर्ण पाकिस्तान आणि चीनला लक्ष्य करू शकते.

शाहीन-3 ची वैशिष्ट्ये
- पाकिस्तानच्या मिलिट्रीच्या मते जमिनीवरून जमिनीवर हल्ल्याची क्षमता असलेले हे क्षेपमास्त्र ट्रेडिशनल वॉरहेडशिवाय न्‍युक्‍ल‍िअर वेपन्सही वाहून नेऊ शकते.
- या नव्या क्षेपणास्त्राची रेंज एवढी आहे की संपूर्ण भारत देश त्याच्या आवाक्यात आहे.
- पाकिस्‍तानने गेल्या वर्षी शाहीन-1 आणि शाहीन-2 ची चाचणी केली होती.

अरबी समुद्रात चाचणी
- पाकिस्तानने अरबी समुद्रामध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी केली. आर्मीने केलेल्या दाव्यानुसार ही चाचणी यशस्वी ठरली.
- चाचणीदरम्यान पाकिस्तानच्या स्‍ट्रॅटेजिक प्‍लान्‍स डिव्हीजन, स्‍ट्रॅटेजिक फोर्सेसचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशिवाय वैज्ञानिक आणि अभियंत्यांची पथके उपस्थित होती.
- चाचणी यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रपती मनमून हुसेन आणि पीएम नवाज शरीफ यांनी वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

पाकिस्तानने दाखवले बळ
- 23 मार्च 2015 रोजी इस्‍लामाबादेत नॅशनल-डे परेड दरम्यान शाहीन 2 मिसाइल दाखवण्यात आले होते.
- शाहीन 1 मध्येही ट्रेडिशनल वॉरहेडबरोबरच अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमताही आहे. त्याची रेंज 900 किमी आहे.
- त्यानंतर चाचणी घेण्यात आलेल्या शाहीन-2 ची रेंज 1500 किमी आहे.

अग्नि-4 क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
> 4000 किलोमीटर रेंज असलेल्या अग्नि क्षेपणास्त्रामध्ये एक टनापर्यंत वजन असलेले अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे.
> पाचव्या जनरेशनची असल्यामुळे अग्नि-4 मिसाइलमध्ये मॉडर्न आणि कॉम्प्यूटर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
> जमीनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता.
> अचूक नेम. 20 मिनिटांत 4000 किमीचे अंतर कापू शकते. म्हणजे पाकिस्तान किंवा चीनमध्ये 20 मिनिटापेक्षा कमी वेळात पोहोचू शकते.
> अगदी छोट्या (1.5 मीटर) टारगेटवरही अचूक नेम साधण्यास सक्षम.
> अग्नि-4 क्षेपणास्त्राची लांबी 20 मीटर आणि वजन 17 टन आहे.
> अग्नि-1, 2 आणि 3 बरोबरच पृथ्वी मिसाइल भारतीय लष्कराच्या ताफ्यात आहे. त्यांची रेंज 3000 किमीपर्यंत आहे.
> डीआरडीओ अग्नि-5 मिसाइलवर काम करत आहे. त्याची क्षमता 5000 किमीपर्यंत असेल.

भारताजवल असलेली क्षेपणास्त्रे
भारताकडे पूर्वीपासूनच अग्नि-1, अग्नि-2, अग्नि-3, पृथ्वी आणि ब्रह्मोस ही क्षेपणास्त्रे आहेत. त्यात अग्नि बॅलिस्टिक मिसाइल आहे. तर ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाइल आहे.