आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK ची धमकी, भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही बनवलीत छोटी अण्वस्त्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पाकिस्तानने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याबरोबर अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी भारताला उत्तर देण्यासाठी छोटी अण्वस्त्रे बनवली असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये प्रेस ब्रिफिंगदरम्यान ते म्हणाले, भारताच्या कोल्ड-स्टार्ट डॉक्ट्रिन आणि हल्ल्याच्या निपटारा करण्यासाठी आम्ही छोटी अण्वस्त्रे तयार केली आहेत. यापूर्वीही माजी राष्ट्रपती मुशर्रफ आणि आर्मी चीफ राहील शरीफ यांच्यासारखे पाकिस्तानचे राजकीय आणि लष्करी अधिकारी यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केली आहेत.

'कोल्ड स्टार्ट' डॉक्ट्रिन म्हणजे काय?
> 2001 मध्ये संसदेवर हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन 'पराक्रम' सुरू केले होते. त्यासाठी बॉर्डरवर खास योजना तयार करण्यात आली होती. पण त्यानंतर 2008 मध्ये मुंबई हल्ला झाला.
> त्यानंतर भविष्यात पाकिस्ताच्या भूमीचा वापर करून हल्ल्याचा कट रचण्यात येऊ नये म्हणून इंडियन आर्मीने नवीन धोरण अवलंबले.
> या 'कोल्ड स्टार्ट' पॉलिसीअंतर्गत आर्मीने 'स्विफ्ट रिअॅक्शन' (प्रत्युत्तरादाखल लगेचच कारवाई)ची स्ट्रॅटेजी तयार केली.
> भारताने असे 8 इंडिपेंडेंट बॅटल ग्रुप तयार ठेवले आहेत ज्यामध्ये कधीही रिस्पॉन्स करण्याची क्षमता आहे. पाकिस्तानचा काऊन्टर अटॅक रोखण्यासाठी काही तासांतच त्या ठिकाणी कारवाईची क्षमता यामध्ये आहे.
> या डॉक्ट्रिनमागचा एक विचार असाही होता की, इंडियन आर्मी मोठी आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास लगेचच प्रत्युत्तर द्यायला छोटे गट असायला हवे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार व्हायलाही संधी देऊ नये अशा प्रकारे हल्ला करावा असाही त्यामागे उद्देश होता.

काय म्हणाले एजाज...
> एजाज म्हणाले की, पाकिस्तान भारताच्या प्रो-अॅक्टिव्ह स्ट्रॅटेजीला तोंड द्यायलाही तयार आहे.
> भारताच्या कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आम्ही अण्वस्त्रे तयार केली आहेत.
> सध्या पाकिस्तान अमेरिकेबरोबर कोणताही अणुकरार करणार नाही.

ही आहेत का पाकिस्तानच्या चिंतेची कारणे
पाकिस्तानी आर्मीने ऑगस्टच्या अखेरीस त्यांच्या देशातील संसदीय समितीसमोर म्हटले होते की, त्यांच्यासाठी देशाबाहेर भारताशिवाय कोणताही दुसरा धोका नाही. भारताकडून एकापाठोपाठ एक होणाऱ्या शस्त्रांच्या खरेदीनेही पाकिस्तानी आर्मी चिंताग्रस्त आहे.
1. हत्यारांच्या खरेदीत भारत आघाडीवर
> बारताने गेल्या काही वर्षांमध्ये 6,31,700 कोटी (100 अब्ज USD) ची शस्त्रे खरेदी केली आहेत.
> डॉन वृत्तपत्राच्या बातमीनुसार भारताने 80% शस्त्रे पाकिस्तानला लक्ष्य करून खरेदी केली आहेत.
> पाकिस्तानी मिलिट्रीच्या मते इंडियन आर्मी केवळ स्पर्धेसाठी असे करत आहे. शस्त्र आयातीच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.

2. भारताते संरक्षण बजेट पाकिस्तानपेक्षा तिप्पट
> गेल्या 10 वर्षांमध्ये भारताने मिलिट्रीवरील खर्च दुप्पट केला आहे. यावर्षी भारताने डिफेन्स बजेट 2.46 लाख कोटी रुपये (40.07 अब्ज USD) ठेवली आहे.
> पाकिस्तानच्या तुलनेत ही रक्कम तिप्पट आहे. पाकिस्तानचे डिफेन्स बजेट 78 हजार कोटी रुपये आहे.
> भारताकडे नेव्ही वॉरशिप आणि टँकही पाकिस्तानपासून सुमारे तीनपट अधिक आहेत.

3. प्रत्येक युद्धात पाकचा पराभव
> 1947 चा संघर्ष, 1965 आणि 1971 चे युद्ध आणि 1999 मध्ये कारगिलमध्ये भारताकडून पाकचा पराभव झाला आहे.
> युद्धात भारताच्या विरोधात कधीही विजय मिळू शकत नाही, हे पाकिस्तानला चांगलेच ठावूक आहे.

तीन वर्षांपूर्वी पाककडे भारतापेक्षा 10 अणुबॉम्ब जास्त होते.
> बुलेटिन ऑफ द अॅटोमिक साइंटिस्टने मार्चमध्ये जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये कोणत्या देशांकडे किती अण्वस्त्रे आहेत हे स्पष्ट केले होते.
> रिपोर्टनुसार पाकिस्तानकडे 110 अणुबॉम्ब आहेत. तर भारताकडे 100 बॉम्ब आहेत. मात्र हे आकडे 2012 चे आहेत. तीन वर्षांमध्ये परिस्थिती किती बदलली आहे याची आकडेवारी नाही.
देश अणुबॉम्ब
भारत 90-100
पाकिस्तान 100-110
चीन 250
अमेरिका 7300
रशिया 8000