आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पाकिस्तानला अतिरेक्यांवर कारवाई करावीच लागेल’; अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पाकिस्तानला दहशतवद्यांविरोधात कारवाई करावीच लागेल, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी म्हटले की, अमेरिका भारतासोबत मिळून दहशतवादाला लढा देत आहे. मागील काही वर्षांत दहशतवादविरोधी अभियानात भारत आणि अमेरिकेचे सहकार्य अधिक दृढ झाले आहे. पाकिस्तानी लोकांसोबत संपूर्ण  क्षेत्रासाठी घातक असलेल्या दहशतवादी संघटनांचा नायनाट करण्यासाठी पाकिस्तानला निर्णायक कारवाई करावी लागेल. टिलरसन देशाच्या थिंकटँक सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमध्ये “डिफायनिंग अवर रिलेशनशिप विथ इंडिया द नेक्स्ट सेंच्युरी’ या विषयावर बोलत होते.    
चीनला केले लक्ष्य : दक्षिण चीन समुद्रावरून चीनने त्यांच्या आक्रमक पावलांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नियम, मुल्यांना आव्हान दिले असून याचा अमेरिका आणि भारत सन्मान करतात. दक्षिण आशियात शांती आणि स्थैर्यासाठी अमेरिकेला भारतासोबत सहकार्य वाढवण्याची गरज आहे. भारतासोबत संरक्षण क्षेत्रातील सहकार्य गेमचेंजर ठरेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.    
बातम्या आणखी आहेत...