नवी दिल्ली- पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला पत्र लिहून काही विषय अजेंड्यावर घेण्याची विनंती केली आहे. यात हैदराबादच्या भारतातील विलिनिकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 1948, 1965 आणि 1971 मध्ये दक्षिण आशियातील सुरक्षेचा मुद्दाही उचलण्यात आला आहे.
पाकिस्तानने काय लिहिले लेटरमध्ये
- संयुक्त राष्ट्रसंघात मलीहा लोधी पाकिस्तानच्या प्रतिनिधी आहेत. त्यांनी सात जानेवारी रोजी सेक्युरिटी काऊन्सिलला पत्र लिहिले.
- भारत आणि पाकिस्तानशी संबंधित तीन मुद्द्यांचा काऊंन्सिलच्या अजेंड्यात समावेश करण्यात यावा, असे यात सांगितले आहे.
- लोधी यांचे लेटर 8 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले.
- याच्या तीन दिवसांपूर्वी महासचिव बान की-मून यांनी जनरल असेम्ब्लिला एक लिस्ट दिली होती.
- यात संयुक्त राष्ट्रसंघाकडे असलेले विषय सामिल होते. यावर सुरक्षा परिषदेने गेल्या तीन वर्षांत चर्चा केलेली नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, या विषयांबाबत काय म्हणाले संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की-मून....