आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistani Leader Put Rs 1 Billion Bounty On Arrest Of PM Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींना अटक करा, एक अब्ज मिळवा; पाकच्या खासदाराने केली घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अटकेवर एक अब्ज रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या रावलकोटमध्ये जमात-ए-इस्लामीचे प्रमुख आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाचे खासदार सिराजुल हक यांनी ही घोषणा केली आहे. मात्र त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांच्याच देशात विरोध सुरू झाला आहे. पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारने ट्वीटद्वारे त्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी या पैशाचा वापर त्यांच्या भागामध्ये रुग्णालय किंवा मुलांसाठी शाळा सुरू करण्यासाठी करावा.

पाकिस्तानी वृत्तवाहिनी एआरवाय न्युजच्या वृत्तानुसार संबंधित खासदार त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना बोलत होते. ते खैबरपख्तूनख्वां येथून संसदेचे सदस्य आहेत. नुकतीच त्यांची निवड झाली आहे. या वृत्तवाहिनीनेही हक यांचे भाषण वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे.

हक यांनी काश्मीरबाबतही वक्तव्य केले आहे. भारत सरकार हा काश्मीरच्या लोकांच्या स्वातंत्र्यामधील सर्वात मोठा अडथळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत कधीही पाकिस्तानचा मित्र असू शकत नाही आणि जे अशा मैत्रिची चर्चा करतात, त्यांनी भारतात निघून जावे, असेही ते यावेळी म्हणाले.

पाकिस्तानी नेत्यांवरही हक यांनी हल्ला चढवला. पाकिस्तानी नेते आंधळे आणि कर्णबधीर असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानी नेते कश्मिरींचे बलिदान विसरले आहेत. काश्मीरचा मुद्दा ‘बस डिप्लोमसी’ आणि ‘फनकार डिप्लोमसी’ ने सोडवता येणार नाही, असे ते म्हणाले.