आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये उष्माघाताचे 782 बळी, ही आहेत महत्त्वपूर्ण कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- सिंध प्रांत आणि कराची शहरात काल (मंगळवार) एका दिवसात उष्माघाताने तब्बल 337 लोकांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा 782 पर्यंत पोहोचला आहे. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील तापमान 42 ते 45 डिग्री सेल्सियस दरम्यान आहे. डॉन या वृत्तपत्राने मात्र उष्माघाताने 744 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
सिंधच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, की येथील रुग्णालयांमध्ये मेडिकल इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. उष्माघाताच्या रुग्णांसाठी वेगळ्या वार्डांची व्यवस्था करण्यात आली आहे. कराचीच्या सरकारी रुग्णालयात 11,500 रुग्णांची व्यवस्था आहे. पण रुग्णांची संख्या बघता ही संख्या कमी पडण्याची दाट शक्यता आहे. सिंधचे मुख्यमंत्री सईद कईम अली शहा यांनी शाळा, कॉलेज आणि सरकारी ऑफिसेसला सुटी जाहीर केली आहे.
यामुळे होत आहेत मृत्यू
* कोस्टल एरिया असल्याने कराचीमध्ये दमटपणा जास्त असतो.
* या भागात वीज पुरवठा सुरळीत नाही. कायम भारनियमन केले जाते.
* रमजानचा महिना असल्याने उपास केले जातात. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते.
उलटी वाहत आहे हवा
मॉन्सून येण्यापूर्वी कराचीत प्रत्येक वर्षी प्रचंड उकाडा असतो. अरबी समुद्राच्या शेजारी असल्याने येथील हवामान दमट आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे कराचीत अचानक गार हवा होती. ती शहराकडून समुद्राच्या दिशेने वाहत होती. त्यामुळे गर्मी आणखी वाढली. पाकिस्तानच्या हवामान खात्याचे संचालक डॉक्टर रसून यांनी सांगितले, की प्रत्ये वर्षी मे आणि जून महिन्यात पाकिस्तानमध्ये उष्माघाताचा प्रकोप असतो. पण यावर्षी त्यात चार दिवसांनी वाढ झाली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, प्रचंड उकाड्याने आणि कडक उन्हात असे होरपळत आहेत पाकिस्तानी...
बातम्या आणखी आहेत...