आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DON’T MISS! पाकिस्तानी सलमानलाही जायचे आहे तुरुंगात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- पाकिस्तानमधील सलमान एका जाहिरातीतही झळकला आहे.)
पाकिस्तानमध्येही एक सलमान आहे असे म्हटले तर धक्का बसेल. पण हे खरे आहे. केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्ये एक सलमान खान आहे. तो सलमान सारखा दिसतो, बोलतो आणि राहतोही. तो अगदी हुबेहुब सलमान दिसतो. पाकिस्तानमध्ये तो सलमान खान म्हणून प्रसिद्ध आहे. आता तर त्याने हद्द केली आहे. तो म्हणतो, की भारतातील सलमानला जर तुरुंगवास झाला तर मलाही तुरुंगात जायचे आहे. तुरुंगात कसे काय फिल होते हे मलाही अनुभवायचे आहे.
पाकिस्तानमधील या सलमान खानचे मुळ नाव हुसनैन सलिम असे आहे. सध्या भारतात सलमान खान प्रकरण बरेच गाजत आहे. या प्रकरणाकडे पाकिस्तानचेही लक्ष लागलेले आहे. या पार्श्वभूमिवर या सलमान खानच्या मुलाखती टीव्हीवर झळकत आहेत. यात तो अगदी सलमानची कॉपीकॅट असल्याचे भासविण्यात जराही कमी पडत नाही. त्याने तर सांगितले आहे, की भारतातील सलमानला तुरुंगवास झाला तर मलाही तुरुंगात जायचे आहे. मलाही तरुंगातील वातावरण अनुभवायचे आहे. त्याचे हे वागणे जरा ओव्हर अॅक्टिंग वाटत असले तरी पाकिस्तानी लोकांना आवडत आहे. लोक त्याचे म्हणणे गांभीर्याने ऐकत आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, पाकिस्तानमधील सलमान खानचे आणखी काही फोटो.... तो दिसतो अगदी सलमान सारखा...