आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पाकच्या ताब्यातील काश्मीर’, पाकिस्‍तानमध्‍ये शालेय अभ्यासक्रमातून दिले जातात धडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानने भलेही जम्मू आणि काश्मीरच्या भागावर कब्जा करून त्याला ‘स्वतंत्र काश्मीर’ असे नाव दिले आहे, पण तेथील मुलांना मात्र तो ‘जम्मू-काश्मीरचा पाकिस्तानच्या ताब्यातील भाग’ असेच शिकवले जात आहे. इयत्ता पाचवीच्या पर्यावरण आणि समाजशास्त्राच्या पुस्तकात हे स्पष्टपणे लिहिले आहे.  
 
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सहर कामरान यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘पाकिस्तानमध्ये सिंध, बलुचिस्तान, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा हे चार प्रांत आहेत. इतर प्रशासकीय विभागांची नावे अशी : १) इस्लामाबाद (राजधानीचा प्रांत), २) गिलगिट बाल्टिस्तान (त्याला आधी उत्तर भाग म्हटले जात असे), ३) केंद्रीय प्रशासकीय भाग (वायव्येकडील अर्धस्वायत्त भाग) आणि ४) स्वतंत्र काश्मीर (जम्मू-काश्मीरचा पाकिस्तानच्या कब्जात असलेला भाग.’   
 
पाठ्यपुस्तकांत ‘जम्मू-काश्मीरचा पाकिस्तानच्या कब्जातील भाग’ असे मोठ्या अक्षरांत लिहिले आहे. ही पुस्तके लाहोर, सक्कर, कराची, लाहोर, पेशावर आणि एबोटाबाद येथेही अभ्यासक्रमात आहेत. ही पुस्तके पॅरामाउंट पब्लिशर प्रायव्हेट लिमिटेडने छापली आहेत. इतर शहरांतील खासगी शाळांतही ती त्यात असावीत.
बातम्या आणखी आहेत...