नवी दिल्ली- उधमपूर हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी नावेद याला जिवंत पकडण्यात आले. त्यानंतर मीडियाच्या प्रतिनिधींसोबत बोलताना त्याने सांगितले, की मी हिंदूंना ठार मारण्यासाठी आलोय. मला लोकांना ठार मारण्यात आनंद मिळतो. त्याचे हे वाक्य जवळपास प्रत्येक मीडियाने कव्हर केले. तेव्हा एकच प्रश्न समोर आला, की पाकिस्तानी नागरिकांच्या मनात भारतीय लोकांबद्दल एवढे विष कुणी पेरले? त्याचे उत्तर सापडते ते पाकिस्तानच्या शालेय पुस्तकांमध्ये. त्यात असे सांगितले आहे, की हिंदू इस्लामचे शत्रू आहेत. हा समाज इस्लामचा कायमस्वरुपी शत्रू आहे.
पाकिस्तानच्या शालेय पुस्तकांमध्ये हिंदूंविरुद्ध वादग्रस्त मजकूर आढळून येतो. त्यावर तेथील नेत्यांनी कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत. विशेष म्हणजे जनतेत भारतद्वेष लहानपणापासून तयार व्हावा यासाठी असा मजकूर शालेय पुस्तकांमध्ये ठेवण्यात आला आहे. कारण पाकिस्तानी राजकारण हे केवळ आणि केवळ भारत द्वेषावर चालते हे नुकत्याच झालेल्या मोदी-शरीफ भेटीतही स्पष्ट झाले आहे.
उभय नेत्यांची विदेशात भेट झाली तेव्हा शरीफ यांनी भारताला अनुकूल घेतलेली भूमिका अनेक पाकिस्तानी नेत्यांना आवडली नाही. त्यांनी शरीफ यांच्यावर प्रखर टीका केली. त्यानंतर शरीफ यांना आपली भूमिका बदलावी लागली. एवढेच नव्हे तर सीमेवर जोरदार गोळीबार करुन पाकिस्तानी लष्कराने दाखवून दिले, की केवळ शरीफ पाकिस्तानचे शासक नाहीत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा आणखी काय लिहिले आहे, पाकिस्तानच्या शालेय पुस्तकांमध्ये....
सौजन्य- रॉयटर्स