आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानी माध्यमांनी आपल्याच सैन्यप्रमुखांच्या सेवानिवृत्तीस म्हटले आहे आश्चर्यकारक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाक सैन्याद्वारे एक ट्विट करून जनरल राहिल शरीफ यांच्या २९ नोव्हेंबरच्या सेवानिवृत्त होण्याच्या बातमीने पाकिस्तानी माध्यमे त्रस्त आहेत. पाक चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांनीदेखील लाहोरपासून निरोपाच्या भेटी देणे सुरू केले आहे. पाकिस्तानात सैन्याने अनेकदा सरकारचे तख्त पालटले आहे. अशा पार्श्वभूमीवर राहिल यांचे वेळेनुसार शांततेत निवृत्त होणे लोकांना आश्चर्यचकित करत आहे.

द एक्स्प्रेस ट्रिब्यून

लष्करप्रमुख राहिल यांचे निरोप घेणे त्रस्त करतेय
आयएसपीआरच्या महासंचालकांनी केलेल्या ट्विटमुळे मीडियात हडकंप झालाय. सेना आणि सरकारमध्ये सातत्याने रस्सीखेचामुळे निवृत्तीच्या या बातमीला महत्त्व आले आहे.देशात जिथे अनेक सेनाप्रमुख एकतर कार्यकाळ वाढवून दीर्घकाळापर्यंत पदावर टिकून राहिलेले आहेत वा मग रात्रीत सत्तापालट करतात, तिथे राहिल शरीफ यांच्या निवृत्तीची गोष्ट त्रस्त करणारी नाही का?
द डॉन

दबाव असूनही आपला निर्णय बदलला नाही

मित्र, सहकारी, राजकारणी नेत्यांद्वारे आपल्या निर्णयाची समीक्षा केली जाण्याच्या आवाहनानंतरही राहिल विचलित झाले नाहीत. राहिल शरीफ यांना पदावर कायम ठेवावे, यासाठी लोकांनी अनेक वेळा सरकारवर दबाव आणला; त्यासाठी आग्रहही धरला.पण शेवटी खरी गोष्टच कायम राहिली आणि एका चांगल्या अधिकाऱ्याला या आठवड्यात सन्माननीय निरोप दिला जाऊ शकेल.

द नेशन : पदावर कायम राहण्याची संधी होती
राहिल निवृत्तीच्या निर्णयावर कायम आहेत. याचे आश्चर्य वाटतेय. त्यांच्याकडे कार्यकाळ वाढवून पदावर कायम राहण्याच्या अनेक संधी होत्या. लोक असेही म्हणत होते की, पनामा पेपर्समध्ये नवाझ शरीफ यांचे नाव येणे आणि भारताशी तणाव वाढल्यानंतर राहिल यांच्याकडे पदावर राहण्याची सुवर्णसंधी होती.

राहिल यांच्यापूर्वी दोन्ही लष्करप्रमुखांना मुदतवाढ

-राहिल शरीफ यांनी २९ नोव्हेंबर २०१३ रोजी पाक चीफ ऑफ आर्मी स्टाफचे पद हातात घेतले होते.
-ते पाकचे १५ वे सैन्यप्रमुख होते. त्यांच्यापूर्वी सेनाप्रमुख राहिलेले जनरल कयानी,परवेझ मुशर्रफ, दोघांचा कार्यकाळ वाढवला होता.
-१९९० मध्ये नवाझ यांनी जनरल जहांगीर यांना कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पदावरून हटवले होते.

पंतप्रधान निश्चित करतात लष्करप्रमुखाचे नाव

-सेनाप्रमुख नियुक्त करण्याचा अधिकार पीएम यांच्याकडे आहेत. संरक्षण मंत्रालय ३ नावे पाठवते.
-नियुक्तीत वरिष्ठता महत्त्वाची आहे, पण दोन वरिष्ठ जनरल्स यांना निलंबित करून राहिल शरीफ यांना सैन्यप्रमुख बनवले होते.
नवाझ चौथ्या क्रमांकाचे आसिफ आणि तिसऱ्या क्रमांकाचे मुशर्रफ हे आर्मी चीफ झालेले आहेत.
विक्रम : ६ आर्मी चीफ बनविणारे पीएम होतील नवाझ
राहिल शरीफ हे नवाझद्वारे नियुक्त झालेले ५ वे आर्मी चीफ आहेत. नवाझ ६ व्यांदा सैन्यप्रमुखांना नियुक्त करतील. यापूर्वी ते १९९१ मध्ये जनरल अासिफ जंजुआ, १९९३ मध्ये जनरल वहीद काकर, १९९८ ला जनरल मुशर्रफ, १९९९ मध्ये जियाउद्दीन बट आणि २०१३ ला जनरल राहिल यांची नियुक्ती केली.
बातम्या आणखी आहेत...