आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बवर्षावाने उद्ध्वस्त पॅलेस्टाइनमध्ये तरुणांचा रस्त्यावर व्यायाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅलेस्टाइनच्या गाझा येथे सध्या ‘बार पॅलेस्टाइन’ समूहाचे सदस्य विविध कसरती करताना दिसून येत आहेत. विशेषत: कसरती युद्धात उद्ध्वस्त झालेल्या प्रदेशांत करण्यात येत आहेत. बागा, समुद्रकिनारे, भग्न इमारतीत हे तरुण दिसून येतात. याला ‘स्ट्रीट वर्कआऊट’ असेही म्हटले जाते. हा प्रकार सध्या फार लोकप्रिय होत आहे. जागतिक स्पर्धेसाठी देशाला तयार करणे व तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला.

अमेरिकेत झाली होती सुरुवात
स्ट्रीक वर्कआऊट म्हणजे चार भिंतींच्या बाहेर खुल्या आकाशाखाली कसरती करणे. याची सुरुवात न्यूयॉर्क शहरात झाली. अॅथलेटिक्स, केलिस्थेनिक्स स्पोर्ट्सचे हे संयुक्त रूप आहे. यात पुलअप्स, चिनअप्स, पुशअप्स, डिप्स, मसलअप्स, सिटअप्स आणि स्क्वेड्सचा समावेश असतो. ह्युमन फ्लॅग, फ्रंट लिव्हर, बॅक लिव्हर आणि प्लँकही केले जातात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कसे करतात पॅलेस्टाइनचे तरुणारस्त्यावर व्यायाम
बातम्या आणखी आहेत...