आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत पनामा पेपर्सशी संबंधित फौजदारी चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकी विधी विभागाने पनामा पेपर्सशी संबंधित बनावट कंपन्यांच्या फौजदारी चौकशीस सुरुवात केली असल्याचे अधिकृत पत्रकात समोर आले आहे. मॅनहॅटन यूएस अॅटर्नी प्रती भरारा यांच्या पत्रात आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारांच्या संघटनेशी (आयसीआयजे) चौकशीबाबत चर्चा करण्यास सांगितले आहे. आयसीआयजेने पनामा पेपर्सचे दस्तऐवज उघड केली आहेत. ३ एप्रिलच्या या पत्रात भरारा यांच्या कार्यालयाने पनामा पेपर्सशी संबंधित फौजदारी चौकशी सुरू केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात आयसीआयजेच्या एखाद्या प्रतिनिधीला बोलण्याची लवकरच संधी मिळेल. पत्रामध्ये चौकशीच्या विषयाची माहिती देण्यात आली नाही.