आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panama President Juan Carlos Varela Speaks To France's Francois Hollande Post Data Leak

पनामा पेपर्स : कायदेशीर घडामोडींत पारदर्शकतेचा प्रयत्न : राष्ट्राध्यक्ष वरेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पनामा सिटी - पनामा सरकारने आपल्या अर्थ उद्योगात पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे जाहीर केले आहे. पनामाचे राष्ट्राध्यक्ष जुआन कार्लोस वरेला यांनी गुरुवारी ही घोषणा केली. त्याचबरोबर इतर देशांना सहकार्य करण्याची तयारीदेखील दर्शवली आहे. दुसरीकडे काळ्या पैशांच्या व्यवहाराच्या तपासात सहकार्य केले नाहीतर पनामासारख्या देशांवर निर्बंध घातले जातील, असा इशारा युरोपियन संघटनेने शुक्रवारी दिला. या प्रकरणात कायद्याच्या पेचात अडकलेली फर्म मोसॅक फोन्सेकाचे मालक अापले मित्र असल्याचे वरेला यांनी म्हटले आहे. या वर्षी सुरुवातीला फोन्सेकावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. ते आरोपही वरेला यांनी फेटाळून लावले. फर्मच्या ब्राझीलमधील शाखेवर ब्राझीलची तेल कंपनी पेट्रोब्रासमधील पैशांचा अपहार करून पनामामध्ये बनावट कंपनी स्थापन केली. ल्याचा हा आरोप होता. दुसरीकडे पनामा पेपर्सचा भंडाफोड करणाऱ्या जर्मन वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार १.१५ कोटी दस्तऐवज जाहीर केले नाहीत.
स्वेदाडायचे जाईतुंग गुरुवारी म्हणाले, चुकीचे काम करणाऱ्या संशयितांकडून दस्तऐवज हस्तगत करण्याचा प्रशासनाला अधिकार आहे.

काय आहे पनामा प्रकरण?
शोधपत्रकारिताकरणाऱ्या समूहाने जगभरातील बड्या नावांचा समावेश असलेल्या पनामामधील कंपन्यांतील आर्थिक व्यवहाराशी संबंधित प्रकरणाची पोलखोल केली. त्याला पनामा पेपर्स लीक असे नाव देण्यात आले आहे. मोसॅक फोन्सेकाच्या माध्यमातून या कंपन्या तयार करण्यात आल्या. त्याच्या मालकाने ही पोलखोल गुन्हा असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आइसलँडमध्ये वादंग निर्माण झाले असून पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. काळा पैसा पांढरा करून तो पनामामधील कंपन्यांत गुंतवण्यात आला. त्यात अनेक नावांचा समावेश आहे.