आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण: चीनच्या कूटनीतीचे नवे साधन, पांडा बचाव मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वोलांग/ चीन- पांडाच्या मुलांना मूर्ख बनवता अाले नाही. ताे केवळ चार महिन्यांचा अाहे. अाणि त्याच्या शरीरावर उबदार केसांची वाढ अजून सुरुच अाहे. तरीही ताे अातापासूनच अनेक गाेष्टी समजू शकताे. परंपरागत मिळालेल्या तीक्ष्ण दातांचा उपयाेग करुन त्याने अाजूबाजूला लपेटलेल्या हातांचा चावा घेतला. त्यातून त्याला समजले की त्याच्या अाजूबाजूला असलेले पांडा हे अस्सल नसून पांडाचा मुखवटा अाणि वेशभूषा केलेली माणसे अाहेत. ही माणसे पांडाची देखभाल करण्यात गुंतले अाहेत.

अाम्ही वाेलांगच्या पहाडी वस्तींमधील बांबूच्या ढिगाऱ्यावर उभे अाहाेत. इथे अनेक दशकांपासून चीनचा राष्ट्रीय प्रकल्प सुरु अाहे. दक्षिण पश्चिमी सिचु्अान प्रांतात जंगली पांडासमवेत मिलन घडवून त्यांची संख्या वाढवण्यात अाली. अशाप्रकारे जन्म घेणाऱ्या पांडाला जंगलात साेडले जात अाहे. पांडा संरक्षण अाणि संशाेधनाचे प्रमुख झांग जेमीन सांगतात की जेव्हा त्यांनी प्रकल्पावर काम सुरु केले, तेव्हा इतक्या माेठ्या प्रमाणात पांडा शावकांना जन्म देणे शक्य हाेईल. पांडाला पुन्हा जंगलात साेडण्याच्या प्रक्रीयेला २५ -३० वर्ष लागू शकतात.

माअाेच्या काळापासून चीन त्यांच्या मित्र देशांना पांडा हा प्राणी भेटस्ववरुपात देत अाला अाहे. चीनच्या अार्थिक अाणि लष्करी ताकदीकडे पाहून जेव्हा दुसऱ्या देशांना इर्षा वाटत असते. तेव्हा चीनच्या या शाकाहारी पांडा भेटीने चीनचा कमी धाेकेदायक चेहरा जगापुढे जाताे, अशी त्यांची भावना असते. चीनसाठी पांडा हा एक वेगळ्या प्रकारचा उद्याेगच अाहे. चीन विदेशी प्राणीसंग्रहालयांना पांडा देताे. मात्र पूर्णपणे देण्याएेवजी केवळ दहा वर्षांसाठी देतात. एका जाेडीचे भाडे वार्षिक सहा काेटी पन्नास लाख रुपये इतके प्रचंड अाहे. पांडाचे संरक्षण अाणि संशाेधन या विदेशी रकमेच्या माध्यमातूनच केले जाते. त्याशिवाय त्या काळात जर पांडाच्या जाेडीने काही शावकांना जन्म दिला तर ती शावके चीनला परत करावी लागतात. पांडा हा अनेक वर्षांपासून चीनचा राजनैतिक हत्यार बनलेला अाहे. पांडा कुटनीतीचा प्रारंभ १९७२ साली झाला हाेता. अमेरिकेचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी चीनयात्रा केली. तेव्हा चीनने वाॅशिंग्टनच्या प्राणीसंग्रहालयासाठी पांड्याची दाेघांची जाेडी दिली. सध्या किमान १२ देशांमध्ये असलेले ५१ पांडा जगभरातील प्राणीसंग्रहालयांची शाेभा वाढवत अाहेत. अजूनही ज्या देशांशी चीनचे संबंध चांगले अाहेत, त्यांना भेट म्हणुून पांडा दिला जाताे. पुढील भेट दक्षिण काेरीया, नेदरलंॅडला दिला जाणार अाहे. २०१४ मध्ये जेव्हा जर्मनीच्या चॅन्सलर मर्कल चीन दाैऱ्यावर अाल्या, तेव्हा त्यांनी बर्लीनच्या प्राणी संग्रहालयासाठी पांडा जाेडी मागितली हाेती. झांग जेव्हा १९८३ मध्ये वाेलांग पांडा संरक्षण केंद्रात अाले तेव्हा तिथे दहा पांडा हाेते. चीनमध्ये त्यांची एकूण संख्या १००० पेक्षा कमी हाेती. अनेक वर्षांपर्यंत त्यांची संख्या वाढवण्याच्या प्रयासांना खास यश मिळाले नाही. २००० सालापासून कृत्रिम गर्भधारणेद्वारे पांडाच्या संवर्धनाच्या कामात खऱ्या अर्थाने यश िमळण्यास प्रारंभ झाला.
गतवर्षी जाहीर झालेल्या सर्वेक्षणात चीनमध्ये १८६४ पांडा असल्याचे जाहीर झाले. दहा वर्षांपूर्वी ही संख्या १६०० हाेती. जंगलताेडीमुळे पांडाचे अस्तित्व संकटात सापडले अाहे. दुष्काळ अाणि बांबूच्या झाडांवर राेग पडण्याने त्यांचे अन्न कमी हाेत जाते. त्यांची संख्या वाघ, गेंडासारख्या लुप्त हाेत असलेल्या प्राण्यांपेक्षाही कमी अाहे