आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हवेत उघडले नाही पॅराशुट, साथिदाराने पकडून वाचवला जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- येथील एअर शोमध्ये रेड डेव्हिल पॅरॅशुटिंग टीमने सर्वांच्या टाळ्या घेतल्या. शिस्तबद्ध कसरती दाखवून लोकांनी मने जिंकली. यावेळी विमानातून उडी मारल्यावर एका पॅरॅट्रुपरचे पॅराशुट उघडलेच नाही. तो वेगाने जमिनीकडे येऊ लागला. जिवाच्या भीतीने हवेत हात-पाय मारु लागला. परिस्थितीचे गांभीर्य बघून त्याच्या साथिदाराने त्याला हवेतच पकडले. हळूहळू त्याला खाली घेऊन आला. त्यानंतर दोघे खाली पाण्यात पडले. त्यानंतर बचाव पथकाने दोघांची सुटका केली. हे बघून प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
गेल्या पंचवीस वर्षांत पहिल्यांदा घडली ही घटना
रेड टेव्हिल टीमने सांगितले, की दोघांची प्रकृती उत्तम आहे. गेल्या पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच असे झाले, की पॅरॅशुट उघडले नाही. ही टीम प्रत्येक वर्षी 60 पेक्षा जास्त वेळा असे शो करते. इंटरनेटवरही ही टीम फेमस आहे.
पुढील स्लाईडलवर बघा, अशी घडली घडना.... अनुभवा हवेतील रोमांच...