आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजगराला खेळण्यासारखे हाताळते ही 2 वर्षांची चिमुरडी, असे करते Kiss

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजगराबरोबर खेळताना 2 वर्षांची अलिशा. - Divya Marathi
अजगराबरोबर खेळताना 2 वर्षांची अलिशा.
इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड शहरातील एका कुटुंबाने घरात 19 साप पाळले आहेत. त्यात अनेक साप विषारी आहेत. एवढेच नाही तर या फॅमिलीने एक अजगरही पाळला आहे. तो या 2 वर्षांच्या अलिशा मोएला भलताच आवडतो. 83 किलोचा हा अजगर क्षणात या चिमुरडीला गिळंकृत करू शकतो. पण तरीही ही मुलगी त्याच्याशी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळते.

घरातच साप पाळणाऱ्या रॉब कोवानने सांगितले की, त्याला आणि त्याची पार्टनर स्टेसीला सापांची आवड आहे. त्यामुळे त्यांनी घरातच 19 साप पाळले आहेत. त्यात एका अजगराचाही समावेश आहे. त्याला आम्ही ऑस्टीन म्हणतो असेही रॉबने सांगितले. ऑस्टीन हा अजगर आपल्या दोन वर्षांच्या मुलीला म्हणजेच अलिशालाही आवडत असल्याचे ते सांगतात. ऑस्टीनला हातात पकडून ती त्याला किसही करते. पण हा अजगर यादरम्यान एकदम शांत असतो. त्याने एकदाही अलिशावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

रॉबच्या मते, हे साप त्याच्या कुटुंबाचेच सदस्य आहेत. अलिशा त्याला गुड नाइट विश केल्याशिवाय झोपतच नाही. यावरून या गोष्टीचा अंदाज येऊ शकतो. तसेच त्यांचा सहा महिन्यांचा मुलगाही त्याला पाहून चांगलाच आनंदी होत असतो. अजगर हा अत्यंत धोकादायक असतो. तो अगदी डुकरापासून ते मगरीपर्यंत अनेक प्राण्यांची शिकार करू शकतो. पण रॉबचे कुटुंब त्याला जराही घाबरत नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...