आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांनी हॉस्पिटलमध्येला लावले लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - मृत्यूआधी पाच वर्षांच्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यात आली. आपल्या मुलाची सोबत जास्त दिवस असणार नाही, याची जाणीव झालेल्या आई-वडिलांनी मुलाच्या इच्छेखातर हॉस्पिटलमध्ये लग्न केले. क्रेग आणि जेम्मा गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, मात्र दोघांनी लग्न केले नव्हते.

टेनमाऊथ, डेवोनचा रहिवासी पाच वर्षांच्या कोरी अॅडवर्डला गंभीर हृदयरोग होता. ब्रिटनच्या ब्रिस्टल रॉयल हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये जानेवारीपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. कोरी सात महिन्यांचा होता तेव्हापासून त्याला गंभीर हृदयरोग जडला होता. त्याला बरे वाटावे यासाठी आतापर्यंत आठ ओपन हार्ट सर्जरी करण्यात आल्या होत्या. आपल्या आई-वडिलांनी लग्न करावे, अशी कोरीची अखेरची इच्छा होती. हॉस्पिटल व्यवस्थापनानेही त्याच्या इच्छेचा मान राखत लग्नाला परवानगी दिली.

कोरीचे आई-वडील क्रेग आणि जेम्मा यांनी मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी रुग्णालयात लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न पाहिल्यानंतर कोरीने पाच दिवसांनंतर प्राण सोडला. कोरीला दोन बहिणी - दोन वर्षांची इजाबेल आणि सहा महिन्यांची कॅटलिन आहे. क्रेग व जेम्माच्या म्हणण्यानुसार, मुलगा जाणार हे कळल्यावर त्याच्या खाटेजवळ बसून रडण्यापेक्षा आमच्यासाठी तो दिवस विशेष होता. आमच्या निर्णयामुळे तो खूप आनंदी होईल याची आम्हाला जाणीव होती. तो दिवस आम्ही कधीही विसरू शकणार नाहीत.