आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिस हल्ला : मास्टरमाइंडची आत्महत्या, पत्नीने स्वत:ला स्फोटाद्वारे उडवून घेतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- पॅरिस दहशतवादी हल्ल्याच्या हल्लेखोरांची धरपकड करण्यासाठी फ्रान्स पोलिसांनी बुधवारी पहाटे सेंट डेनिस उपनगरात एका अपार्टमेंटवर हल्ला चढवला. पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे आठ तास जोरदार चकमक झडली. त्यात हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्देलहमेद अबाऊदने आत्महत्या केली. त्याच्या पत्नीने स्फोट घडवून स्वत:ला उडवून दिले.
पोलिसांनी बुधवारी पहाटे साडेचार वाजता अपार्टमेंटवर धाड टाकली. याच अपार्टमेंटमध्ये पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड अबाऊद दबा धरून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुमारे एक तासाच्या चकमकीनंतर एका महिला फिदाईनने स्फोटकाच्या जॅकेटचा स्फोट घडवून स्वत:ला उडवून दिले. ती अबाऊदची पत्नी होती. अन्य एक दहशतवादी पोलिसांची गोळी लागून मारला गेला. मास्टरमाइंड अबाऊदने आत्महत्या करून घेतल्यानंतर ही चकमक संपुष्टात आली. या चकमकीत पाच पोलिसही जखमी झाले.

ओबामा म्हणाले : पुतीन उपयुक्त सहकारी
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सिरिया प्रकरणात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना उपयुक्त सहकारी असल्याचे म्हटले. मात्र पुतीन यांनी सिरियाचे राष्ट्रपती असद यांचा बचाव करण्यापेक्षा आपले लक्ष्य इसिसचा खात्मा करण्यावर केंद्रित करावे, असा सल्लाही दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कशी सुरू आहे फ्रान्सची कारवाई...